शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बेचव रस्समवरून लग्न मोडलं, पण अखेर दुस-याशी लागलं

By admin | Updated: February 1, 2016 14:05 IST

रिसेप्शनच्या जेवणामधलं रस्सम बेचव होतं, म्हणून नवरदेवानं लग्न मोडल्याची आणि नंतर एका लांबच्या नातेवाईकाने लग्न करत शेवट गोड केल्याची घटना घडली आहे.

ऑनलाइन लोकमत
टूमकूर ( कर्नाटक), दि. १ - रिसेप्शनच्या जेवणामधलं रस्सम बेचव होतं, म्हणून नवरदेवानं लग्न मोडल्याची आणि नंतर एका लांबच्या नातेवाईकाने लग्न करत शेवट गोड केल्याची घटना घडली आहे. 
एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटावी असा हा सीन असला तरी ती सत्यकथा आहे. टुमकूरमधल्या कुमीगल येथे हा प्रकार रविवारी घडला आहे. लग्नाच्या आदल्या रात्री रिसेप्शन ठेवण्यात होतं आणि जवळपास ३०० पाहुणेही आले होते.
एकीकडे वधु आणि वर विधींमध्ये व्यस्त होते आणि दुसरीकडे भोजनाचा कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी वराच्या वडिलांनी जेवणामधल्या रस्समची चव खराब असल्याचा आरडाओरडा केला आणि मुलीच्या घरच्यांशी वाद घातला. हा प्रकार घडल्यानंतर विधी सोडून नवरदेव आला आणि तोही वडिलांच्या बाजुने बोलायला लागला. अखेर, बंगळूरचा असलेला नवरदेव आणि त्याचे कुटुंब चक्क सभामंडप सोडून निघून गेले.
मुलगा व मुलीने स्वखुशीने एकमेकांना निवडलेले असताना असा प्रकार का घडावा असा प्रश्न वधुपित्यांना पडला. अत्यंत विचित्र अवस्थेत सापडलेल्या वधुपित्याने मुलीशी लग्न करायला कुणी इच्छुक आहे का याची विचारणा केली आणि एक दूर दूरचा नातेवाईक त्यांच्या सहाय्यास आला आणि त्याने लग्नास सहमती दर्शवली.
त्यामुळे रस्समच्या चवी वरून एकाशी मोडलेले लग्न दुस-याशी लागले आणि शेवट गोड झाला.