शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाहुबली 2 दाखवण्याच्या बहाण्यानं साध्वी फरार

By admin | Updated: June 15, 2017 20:10 IST

अहमदाबादमध्ये पॅरोलवर बाहेर असलेली साध्वी जयश्री गिरी फरार झाली आहे

ऑनलाइन लोकमतगुजरात, दि. 15 - अहमदाबादमध्ये पॅरोलवर बाहेर असलेली साध्वी जयश्री गिरी फरार झाली आहे. साध्वी बुधवारी हिमालय मॉलमध्ये गेली होती. तिथे शौचालयात जाण्याच्या बहाण्यानं ती पसार झाली आहे. पालनुपरमधून अटक केलेली साध्वी साबरमती तुरुंगात जेरबंद होती. साध्वी जयश्री गिरी वैद्यकीय पॅरोलवर बाहेर आली होती. रुग्णालयातील उपचारानंतर साध्वी चित्रपट पाहण्याच्या निमित्तानं मॉलमध्ये गेली होती. तिच्यासोबत पोलीसही होते. मॉलमधील सीसीटीव्ही फुटेजनुसार, साध्वीनं मॉलमध्ये जाऊन पहिल्यांदा शॉपिंग केली. त्यानंतर तिने बॉडी मसाजही केला. शौचालयासाठी जाण्याच्या बहाण्यानं पोलिसांना चकवा देऊन ती फरार झाली. साध्वी बाहुबली 2 चित्रपट पाहण्यासाठी मॉलमध्ये आली होती. या प्रकारानंतर पोलीस साध्वी जयश्री गिरी यांच्या तपासाला लागले आहेत. अहमदाबाद क्राइम ब्रँचनं 6 जणांना अटक केली आहे. त्यात 4 पोलिसांचाही समावेश आहे. त्यातील दोन साध्वीचे सहकारी आहेत. साध्वी जयश्री गिरीवर हत्या प्रकरणात खटला सुरू आहे. तसेच साध्वीवर लोकांना घाबरवणे, धमकावणे आणि पैसे उधारीवर देण्यासारखे अनेक गंभीर आरोप आहेत. साध्वीच्या विरोधात एका व्यापा-यानंही तक्रार केली होती. साध्वीवर 5 कोटींचा चुना लावण्याचा आरोप आहे. नोटाबंदीच्या काळात साध्वीला अटक केली होती. त्यावेळी तिच्या  घरातून 2 हजार रुपयांच्या जवळपास 1.5 कोटी रुपयांच्या नोटा सापडल्या होत्या. तसेच दोन किलो सोनं जप्त केलं होतं. साध्वी जयश्री गिरी नोटबंदीनंतर एका गायकावर 2 हजारांच्या नोटा उडवल्याप्रकरणीही चर्चेत आली होती.