सिंहस्थ कुंभमेळ्यात साधूवर हल्ला
By admin | Updated: April 26, 2016 00:16 IST
उज्जैन : मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे सुरू असलेल्या सिंहस्थ महाकुंभ मेळ्यादरम्यान रविवारी एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात एक साधू गंभीर जखमी झाला. दत्त आखाडा परिसरात हा हल्ला झाला.
सिंहस्थ कुंभमेळ्यात साधूवर हल्ला
उज्जैन : मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे सुरू असलेल्या सिंहस्थ महाकुंभ मेळ्यादरम्यान रविवारी एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या हल्ल्यात एक साधू गंभीर जखमी झाला. दत्त आखाडा परिसरात हा हल्ला झाला.तपस्वी गिरी असे या साधूचे नाव आहे. तो गंभीर स्थितीत पडलेला पोलिसांना आढळला. त्याचा गळा चिरण्यात आला आहे. या साधूला इंदोरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान साधूंच्या दोन गटांमध्ये असलेल्या मतभेदातून हा हल्ला झाल्याचा आरोप अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांनी केला आहे.