वाद नव्हे, गैरसमज!चार भाऊ असल्यावर मतभेद, गैरसमज होतातच; पण तरी कुटुंब एकत्र येतेच. मुळात वाद वगैरे काही नव्हता. आता सगळे जण एकत्र आले असून, उद्यापासून जागावाटप सुरू होणार आहे. कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी तिन्ही आखाडे कटिबद्ध आहेत. साधुग्राममधील जागा पुरेशी असून, प्रशासनाला पूर्ण सहकार्य करणार आहोत. साधुग्राममधील एकूण १,७०० प्लॉटस्पैकी ४०० प्लॉटस् काही स्वयंसेवी संस्था व अन्य बाबींसाठी राखीव असून, त्याचे वाटप प्रशासन करील. उर्वरित १,३०० प्लॉटस्चे तिन्ही आखाडे मिळून करणार आहोत.- महंत ग्यानदास महाराज, अध्यक्ष, आखाडा परिषदफोटो आहे : ०९ पीएचजेएल १०३...यांच्यामुळेच वाद मिटला!साधुग्राम जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत देताना महंत ग्यानदास महाराज. शेजारी जगद्गुरू हंसदेवाचार्य व अन्य आखाड्यांचे महंत. जगद्गुरूंमुळेच वाद मिटल्याचे जणू महंत ग्यानदास सांगत आहेत.
साधुग्राम तिढा सुटला (जोड)
By admin | Updated: July 10, 2015 00:30 IST