शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शिवसेनेनंतर अकाली दलावर संकट

By admin | Updated: October 16, 2014 05:02 IST

महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुका आटोपताच भाजपाशी युती कायम ठेवण्याबाबत शिवसेनेनंतर आता शिरोमणी अकाली दलही फेरविचार करण्याची शक्यता आहे

हरीश गुप्ता, नवी दिल्लीमहाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुका आटोपताच भाजपाशी युती कायम ठेवण्याबाबत शिवसेनेनंतर आता शिरोमणी अकाली दलही फेरविचार करण्याची शक्यता आहे. भाजपा आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात कटूता निर्माण झाल्यापासूनच अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर यांचे मोदी सरकारमध्ये कायम राहण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परंतु अवजड उद्योगमंत्री अनंत गीते आणि हरसिमरत कौर यांच्यात तुलना करता येणार नाही. शिवसेना महाराष्ट्रात भाजपाविरुद्ध निवडणूक लढत असतानाही गीते मोदी सरकारमध्ये कायम आहेत. १९ आॅक्टोबरला निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लोकसभेतील शिवसेनेचे १८ खासदार आपला पुढचा कृती कार्यक्रम ठरविणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणात आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली असताना विधानसभा निवडणुकीत शिअदने भाजपाला विरोध करण्याचे काहीही कारण नव्हते. शिअद मोदींच्या +४५ मिशनचे समर्थन करेल, अशी अपेक्षा होती. परंतु प्रकाशसिंग बादल यांचे चौटाला कुटुंबीयांसमवेत ६० वर्षांपासूनचे कौटुंबिक संबंध आहेत, असे सांगत शिअदने भारतीय राष्ट्रीय लोकदलाशी (भारालोद)आघाडी केली. शिअदने लोकसभा निवडणुकीत भारालोदला पाठिंबा दिलेला नव्हता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत या पक्षाशी आघाडी करण्याचे कारण नव्हते, असे स्पष्ट करून भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी मात्र शिअदचा हा युक्तिवाद अमान्य केला होता.अमृतसर लोकसभा मतदारसंघामध्ये अरुण जेटली यांचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर भाजपा शिअदवर कमालीचा नाराज झाला होता. नवज्योतसिंग सिद्धू यांना बाजूला सारण्यासाठीच शिअदने जेटली यांना अमृतसरमधून लढण्याचे निमंत्रण दिले होते आणि तेथे जेटली पराभूत झाल्याने भाजप उद्विग्न होणे स्वाभाविक आहे. आता भाजपाने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सिद्धूंना उतरविल्यानंतर पंजाबमध्येही त्यांच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, असे संकेत दिले आहेत.वित्तमंत्री अरुण जेटली यांनी पंजाबला जादा नित्तीय साहाय्य देण्यास नकार दिला त्याचवेळी भाजपाची ही शिअदविरोधी भूमिका स्पष्ट झाली होती. संपुआ सरकारच्या काळात पंजाबला आवश्यकतेपेक्षा जास्त वित्तीय साहाय्य देण्यात आल्याने आता पंजाबने अधिक साहाय्य मिळण्याची अपेक्षा बाळगू नये, असे जेटली यांनी अकालींना स्पष्टपणे सांगितले होते.