शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गोमंतकीय तरुणाईवर रशियन भाषेचे गारुड !

By admin | Updated: February 1, 2015 01:27 IST

गोव्यात हॉटेलच्या फलकांवर, मेनू कार्डवर असलेली रशियन भाषा आता गोमंतकीय तरुणही बोलू लागले आहेत. यामागे रोजगाराचे कारण तर आहेच,

सुशांत कुंकळयेकर - मडगाव (गोवा) गोव्यात हॉटेलच्या फलकांवर, मेनू कार्डवर असलेली रशियन भाषा आता गोमंतकीय तरुणही बोलू लागले आहेत. यामागे रोजगाराचे कारण तर आहेच, पण त्याचबरोबर जीवनसाथी शोधण्याचेही काहींचे प्रयोजन आहे. एकप्रकारे रशियन भाषेने येथील तरुणाईवर गारुडच केले आहे.२५-३0 वर्षांपूर्वी ब्रिटिश पर्यटकांना गोव्याची भुरळ पडल्यानंतर तेथून पर्यटकांचा ओघ सुरू झाला. साहजिकच पर्यटनाच्या क्षेत्रात काम करण्यासाठी गोव्यातील तरुणांमध्ये इंग्रजी शिकण्याची क्रेझ होती. मात्र सात-आठ वर्षांपासून रशियन पर्यटकांचा ओघ वाढल्याने ‘गोंयकार’ आता रशियन भाषा शिकू लागले आहेत. पर्यटन व्यवसायात जम बसविण्यासाठी तरुण मोठ्या संख्येने रशियन भाषा शिकत आहेत. याशिवाय रशियन युवतींना आकर्षित करण्यासाठी त्यांना या भाषेची गरज भासते. रशियन शिकणाऱ्यांमध्ये काही भारतीय पर्यटकही आहेत, असे निरीक्षण ‘मोगान’ या कोंकणी चित्रपटाचे निर्माते नरेंद्र गावकर यांनी सांगितले. गोव्यात मागील काही वर्षांत रशियन पर्यटक येण्याचे प्रमाण वाढले आहे. गोव्यात येणाऱ्या दहापैकी केवळ एकाच रशियन पर्यटकाला इंग्रजी भाषा समजते. त्यामुळे रशियनांना भुलविण्यासाठी शॅक्स व हॉटेलचे फलकही रशियन भाषेत दिसतात. आता तर पर्यटकांशी संवाद साधण्यासाठी त्यांची भाषा येणेही गरजेचे बनले आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात पर्यटन व्यवसायाशी संबंधित असलेली कोणतीही नोकरी मिळवायची असेल, तर तुम्हाला रशियन भाषा येणे ही जमेची बाजू मानली जाते.बहुतेक ट्रॅव्हल एजंट रशियन भाषा शिकतात. कित्येक वेळा रशियन तरुणींची मने जिंकणे हाही भाषा शिकण्याचा तरुणांचा उद्देश असतो. रशियन भाषा कठीण असली तरी त्यातील काही शब्द समजल्यानंतर रशियन युवतींशी संवाद सुकर होतो. गोव्यात रशियन पुरुषांपेक्षा महिला पर्यटकांची संख्या अधिक असते व तरुणींची संख्या लक्षणीय आहे.- नलिनी ई-सौझा, व्यवस्थापिका, भाषा प्रशिक्षण केंद्र‘आप’ आणि ‘तुम’कधी कधी रशियन संवादाचे बुमरँगही होते. हिंदीप्रमाणेच रशियन भाषेतही ‘तुम’ व ‘आप’ असा फरक आहे. कित्येकदा रशियन भाषा शिकणारे नवशिके ‘आप’च्या जागी ‘तुम’ म्हणतात आणि विसंवाद होतो. ‘प्रिवेट’ म्हणजे रशियन भाषेत ‘हॅॅलो’.एखाद्यांला पहिल्यांदाच भेटतो तेव्हा त्यांना ‘हॅलो’ म्हणायचे नसते. मात्र रशियन संस्कृतीची माहिती नसल्याने ‘हॅलो’ म्हणतात. साहजिकच त्यामुळे गैरसमज होतात, असे गोव्यात स्थायिक झालेल्या स्वेटलाना या रशियन महिलेने सांगितले.गोव्यात येणाऱ्या काही रशियन महिलाही भारतीय भाषा शिकत आहेत. काही रशियन तरुणी तर भारतीय तरुणांशी विवाह करीत आहेत. त्यांना सासू-सासऱ्यांवर ‘इम्प्रेशन’ पाडायचे असते. त्यामुळे त्या हिंदी भाषा शिकत आहेत, असे पणजीच्या भाषा केंद्राच्या संचालक वहिदा सवास यांनी सांगितले.