नवी दिल्ली : टीव्हीवर गाजलेल्या महाभारत या मालिकेत द्रौपदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रूपा गांगुली व भाजपा सदस्य एल. गणेशन यांनी शुक्रवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.सभापती हमीद अन्सारी यांनी दोहोंना शपथ दिली. गांगुली यांनी बंगाल विधानसभेसाठी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती व त्यात पराभूत झाल्या होत्या, तर गणेशन हे मध्यप्रदेशातून राज्यसभेवर गेले आहेत. नवज्योतसिंग सिद्धू यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या रूपा गांगुली नियुक्त झाल्या. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रूपा गांगुली, गणेशन यांना राज्यसभा सदस्यत्वाची शपथ
By admin | Updated: October 15, 2016 01:54 IST