शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पद्मभूषण अनुपम खेर यांचे पुरस्कारांच्या विश्वासार्हतेवरून घुमजाव

By admin | Updated: January 26, 2016 12:43 IST

अनुपम खेर यांनी पाचच वर्षांपूर्वी, २६ जानेवारी २०१० रोजी आपल्या यंत्रणेमध्ये पुरस्कार म्हणजे चेष्टा झाल्याची भावना ट्विटरच्याच माध्यमातून व्यक्त केली होती

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - सोमवारी पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आणि पद्मभूषण पुरस्काराने ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना गौरवण्यात आले. खेर यांनी लगेच ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आणि या पुरस्कारामुळे कृतकृत्य झाल्याची भावना व्यक्त केली. एवढंच नाही तर ही आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी चांगली बातमी असल्याचंही त्यांनी सांगून टाकलं. यातला गमतीचा भाग म्हणजे याच अनुपम खेर यांनी पाचच वर्षांपूर्वी, २६ जानेवारी २०१० रोजी  आपल्या यंत्रणेमध्ये पुरस्कार म्हणजे चेष्टा झाल्याची भावना ट्विटरच्याच माध्यमातून व्यक्त केली होती. कुठलेही पुरस्कार असोत, ते सिनेक्षेत्रातले असोत वा राष्ट्रीय असोत वा पद्म असोत, त्यांच्यामध्ये विश्वासार्हता राहिली नसल्याचे खेर यांनी खेदाने म्हटले होते.
मात्र, पाचच वर्षात त्यांनाच पद्मभूषण पुरस्काराने गोरवल्यावर मात्र, खेर यांना या पुरस्कारांची विश्वासार्हता पटलेली दिसते.
सोशल मीडियावर, या दोन्ही ट्विटसची चांगलीच चर्चा रंगली असून अजून तरी अनुपम खेर यांनी काही प्रत्युत्तर दिलेलं नाही वा आपली बाजू मांडलेली नाही.