शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमांची रेलचेल

By admin | Updated: April 14, 2016 00:53 IST

जळगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त गुरुवारी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्यावतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

जळगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त गुरुवारी विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांच्यावतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पीपल्स रिपब्लिकन पार्टी
पीपल्स रिपब्लिकन पार्टीसह विविध दहा संघटनांतर्फे गुरुवारी सकाळी ८ वाजता रेल्वे स्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजू मोरे उपस्थित राहतील.
मुक्ती फाउंडेशन
मुक्ती फाउंडेशन व मीना हॉस्पिटलतर्फे गुरुवारी सकाळी १०.३० वाजता डॉ.नितीन धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेट बॅँकेच्या बाजूला मोफत अस्थिरोग शिबिर आयोजित केले आहे.
भाजपा जिल्हा महानगर
बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी ६.३० वाजता पालकमंत्री एकनाथराव खडसे रेल्वे स्थानकावरील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर नऊ मंडलांमध्ये दिवसभर विविध कार्यक्रम होतील. दुपारी १ वाजता रेल्वे स्थानकावरील बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सायंकाळी ५ वाजता जयंती मिरवणुकीत सहभागी होणार्‍या मंडळांच्या अध्यक्षांना आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे.
अजयभाऊ सपकाळे प्रतिष्ठान
बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अजयभाऊ सपकाळे प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या मान्यवरांचा सत्कार आयोजित केला आहे. हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.
उर्जा फाउंडेशन
उर्जा फाउंडेशनतर्फे गुरुवारी सकाळी १० वाजता गौतम बुद्धांचे जीवनदर्शन घडवणारी चित्रप्रदर्शनी भरवण्यात येणार आहे. आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांच्या हस्ते चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन होईल.
वीर सावरकर रिक्षा युनियन
वीर सावरकर रिक्षा युनियनतर्फे बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता आकाशवाणी चौकातून रॅलीला सुरुवात होईल. रेल्वे स्थानकाजवळ रॅलीचा समारोप होणार आहे.