शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आरटीआय कार्यकर्त्याने राष्ट्रपतींकडे मागितली आत्महत्येची परवानगी

By admin | Updated: March 7, 2016 12:17 IST

आरटीआय कार्यकर्ते ब्रीजराज किशन यांनी राष्ट्रपतींकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी मागितली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मेरठ, दि. ७ - आरटीआय कार्यकर्ते ब्रीजराज किशन यांनी राष्ट्रपतींकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी मागितली आहे.
आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्यामुळे आपण आत्महत्येची परवानगी मागितली असल्याचे ब्रीजराज यांनी सांगितलं. काही सरकारी अधिका-यांनी जमवलेल्या बेकायदेशीर मालमत्तेप्रकरणी ब्रीजराज यांनी आरटीआयद्वारे माहिती मागितली होती, त्याप्रकरणी त्यांनी जीवे मारण्याची धमकी येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 
 
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार 'कोणी गुन्हेगाराने माझा जीव घेण्यापेक्षा, मी माझा जीव देणं पसंत करेन', असं ब्रीजराज किशन यांचं म्हणणं आहे. ब्रीजराज किशन यांना दोन मुलं असून ते आपल्या आई-वडिलांसोबत राहतात. ब्रीजराज हे  माहिची अधिकार (आरटीआय) कार्यकर्ते असून त्यांनी अनेक घोटाळे उघडकीस आणले आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये विशेषत: मेरठ विकास प्राधिकरण, नगर निगम आणि आवास विकासमध्ये होणा-या घोटाळ्यांचा त्यांनी पर्दाफाश केला होता. 
 
ब्रीजराज यांनी मेरठ विकास प्राधिकरणमधील ४० सरकारी अधिका-यांच्या बेनामी संपत्तीची माहिती मागवली होती. त्यानंतर त्यांना काही कंत्राटदार आणि बिल्डरांकडून धमक्या येऊ लागल्या. याप्रकरणी ब्रीजराज यांनी परतपूर पोलिसांकडे तक्रारदेखील केली मात्र पोलिसांनी त्याकडे कानाडोळा केल्याचा आरोप किशन यांनी केला आहे. अखेर ब्रीजराज यांनी राष्ट्रपतींकडे आत्महत्येची परवानगी मागणारे पत्र पाठवलं आहे.