शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या गर्भातच मुलांना संस्कार देणार RSS

By admin | Updated: May 7, 2017 16:43 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसनं गर्भधारणा विज्ञान संशोधन केंद्राच्या माध्यमातून गर्भातच मुलांना चांगले संस्कार देण्याचा दावा केला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसनं गर्भधारणा विज्ञान संशोधन केंद्राच्या माध्यमातून गर्भातच मुलांना चांगले संस्कार देण्याचा दावा केला आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहयोगी संघटना आरोग्य भारती प्रयत्नशील आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आरोग्य भारतीच्या कार्यक्रमाला गर्भ संस्कार कार्यशाळा असे नाव दिले आहे. दोन दिवसीय चाललेल्या या कार्यशाळेच्या जाहिरात पुस्तिकेत डॉ. करिश्मा नरवीन यांना गर्भ संस्कार स्पेशालिस्ट सांगण्यात आलं आहे. डॉक्टर नरवीन या गुजरातमधील जामनगरमध्ये एका आयुर्वेदिक विश्वविद्यापीठात एक अतिथी व्याख्याता आहेत. त्या कार्यशाळेला संबोधित करण्यासाठी कोलकात्यात येणार आहेत. आयुर्वेदिक विश्वविद्यापीठातील नरवीन यांचे सहकारी डॉ. हितेश जानी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, गर्भ संस्कारांनी प्रतिभाशाली मुलांना जन्म देता येऊ शकतो. तसेच जेनेटिक इंजिनीअरिंगच्या माध्यमातून गर्भातच मुलांना संस्कारी बनवलं जाऊ शकतं. पश्चिम बंगालच्या बाल अधिकार संरक्षण आयोगानं या विरोधात शुक्रवारी कोर्टाचा दरवाजाही ठोठावला होता. आयोगानं याला अवैज्ञानिक सांगितलं आहे. मात्र उच्च न्यायालयानं त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा अनन्या चक्रवर्ती म्हणाल्या, हा विज्ञानावर अंधश्रद्धेचा विजय आहे. तसेच आरोग्य भारतीचे वकील प्रणब घोष यांनी आम्ही न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करणार असल्याचं सांगितलं आहे. व्याख्यानाचा व्हिडीओ सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं आरोग्य भारतीला दिले आहेत.