शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाला २00 ते ३00 रु. मजुरीचा प्रस्ताव

By admin | Updated: February 21, 2016 00:56 IST

दुकानातला नोकर असो की बांधकाम क्षेत्रातील गवंडी, प्लंबर इत्यादींच्या हाताखाली काम करणारा सर्वसाधारण मजूर, दिवसभर घरकाम करणारी मोलकरीण असो की घरकामासाठी नेमलेला

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीदुकानातला नोकर असो की बांधकाम क्षेत्रातील गवंडी, प्लंबर इत्यादींच्या हाताखाली काम करणारा सर्वसाधारण मजूर, दिवसभर घरकाम करणारी मोलकरीण असो की घरकामासाठी नेमलेला घरगडी या सर्व अकुशल कामगारांसाठी लवकरच किमान वेतनाचा कायदा लागू करण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. प्रस्तुत विधेयकाचा मसुदा तयार आहे. कॅबिनेटच्या मंजुरीनंतर हे विधेयक संसदेच्या मंजुरीसाठी पाठवले जाईल.श्रम मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कामगार संघटनांशी चर्चा करून क्षम मंत्रालयाने अकुशल मजूर व कामगारांसाठी किमान वेतन विधेयकाचा मसुदा तयार केला आहे. प्रत्येक क्षेत्रातील अकुशल कामगारांना रोज किमान २00 ते ३00 रुपये मजुरीचा प्रस्ताव आहे. कामाचे तास व वेळेनुसार रक्कम ठरेल. केंद्रीय श्रमसचिव शंकर अग्रवाल म्हणाले की, अकुशल मजूर व कामगारांसाठी किमान वेतनाचे प्रस्तावित विधेयक कॅबिनेटकडे पाठवण्यात आले आहे. अनेक राज्यांत अकुशल मजुरांना अत्यंत कमी मजुरी मिळते. काम नसताना तर त्यांचे अधिकच शोषण होते. काही ठिकाणी निकृष्ठ दर्जाचे धान्य मजुरीऐवजी दिले जाते. अशा वातावरणात साऱ्या देशात अकुशल कामगार व मजुरांना किमान वेतन मिळायलाच हवे, अशी सरकारची इच्छा आहे. तथापि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच अधिक तपशिलांसह त्यावर भाष्य करणे उचित ठरेल.