शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तामिऴनाडूसाठी १ हजार कोटीची मदत - नरेंद्र मोदी

By admin | Updated: December 3, 2015 19:58 IST

तामिळनाडूच्या मदतीसाठी मी तात्काळ १ हजार कोटी देण्याचे निर्देश दिले आहेत असे चेन्नईतील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

ऑनलाइन लोकमत,

चेन्नई, दि. ३ -  मुसळधार पावसामुळे तामिळनाडूत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, या कठिण काळात भारत सरकार पूर्णपणे तामिळनाडूतील जनतेसोबत आहे. तामिळनाडूच्या मदतीसाठी मी तात्काळ १ हजार कोटी देण्याचे निर्देश दिले आहेत असे चेन्नईतील पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

तमिळनाडू राज्याची राजधानी असलेल्या चेन्नईमध्ये झालेल्या विक्रमी पावसानंतर उद्‌भविलेल्या अस्मानी संकटाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेले आहेत. या संकटामुळे शेकडो मृत्युमुखी पडलेल्या तमिळनाडूमध्ये पुढच्या दोन तीन दिवसांत आणखी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय वेधशाळेने वर्तविला असून, यामुळे चेन्नईमधील परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे. चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवल्लुर येथील पूरग्रस्त परिस्थितीचा माहिती घेण्यासाठी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यादेखील या परिसराची हवाई पाहणी करणार आहेत. 

नेवीच्‍या राजाली एयर स्टेशनवर उतरल्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललीता यांची भेट घेतली. 
तामिळनाडूत मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीवर आज लोकसभेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती दिली. पुरामुळे चेन्नईत आतापर्यंत २६९ जणांचा बळी गेल्याचे त्यांनी सांगितले. तसेच केंद्राकडून पूर्ण सहकार्य तामिळनाडूला करण्यात येत आहे, असेही राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. संसदेत बोलताना गृहमंत्री म्हणाले की ' १ ते २ डिसेंबर या २४ तासांच्या काळात राज्यात ३३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या १०० वर्षातील पावसाने गाठलेला हा उच्चांक आहे. तसेच हवामान विभागाने येत्या दोन ते दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 
चेन्नईसह इतर भागांना पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारनं ९४० कोटींच्या निधींची मदत जाहीर केली आहे. सध्या पाऊस थांबला असला तरी येत्या ४८ तासात पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.