रोटरी ईस्टतर्फे सबजेलमध्ये रक्त तपासणी शिबिर
By admin | Updated: January 24, 2016 22:19 IST
जळगाव : रोटरी क्लब ईस्टतर्फे सब-जेलमधील सर्व कैद्यांसाठी मधुमेह व इतर रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ७५ जणांनी भाग घेऊन त्यांच्या मधुमेह व इतर रक्त तपासणी करण्यात आली. ही रक्त तपासणी डॉ.वैजयंती पाध्ये व डॉ.श्रीधर पाटील यांच्या चमूकडून करण्यात आली. सर्व कैद्यांची स्वास्थ्य व्यवस्थित रहावे व मधुमेहाबाबत सर्व कैद्यांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने रोटरी ईस्टतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला होता. हे शिबिर शनिवारी घेण्यात आले.
रोटरी ईस्टतर्फे सबजेलमध्ये रक्त तपासणी शिबिर
जळगाव : रोटरी क्लब ईस्टतर्फे सब-जेलमधील सर्व कैद्यांसाठी मधुमेह व इतर रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ७५ जणांनी भाग घेऊन त्यांच्या मधुमेह व इतर रक्त तपासणी करण्यात आली. ही रक्त तपासणी डॉ.वैजयंती पाध्ये व डॉ.श्रीधर पाटील यांच्या चमूकडून करण्यात आली. सर्व कैद्यांची स्वास्थ्य व्यवस्थित रहावे व मधुमेहाबाबत सर्व कैद्यांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने रोटरी ईस्टतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला होता. हे शिबिर शनिवारी घेण्यात आले.या शिबिरासाठी सबजेलचे अधीक्षक डी.टी.डाबेराव यांनी रोटरी ईस्टचे आभार व्यक्त करीत सर्व कैद्यांसाठी विविध उपक्रम राबवावे असे आवाहन केले. याशिबिराच्या सफलतेसाठी अध्यक्ष संजय गांधी, सचिव डॉ.राहुल भंसाली, नितीन इंगळे, रोटरीचे होणारे नवीन उपप्रांतपाल महेंद्र रायसोनी यांनी नियोजन करीत परिश्रम घेतले. फोटो