शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लबतर्फे तपासणी

By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST

हॅलो १ साठी...

हॅलो १ साठी...

जळगाव- रोटरी क्लब, जळगावतर्फे फिजीओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ.अली इराणी, डॉ.पी.व्ही.गोळे व इतर ११ फिजीओथेरपीस्ट यांनी १३० रुग्णांची तपासणी केली. उद्घाटन प्रांतपाल डॉ.चंद्रशेखर सिकची, डॉ.इराणी, सुरेश केसवाणी यांच्याहस्ते झाले. डॉ.शांताराम तळेले, डॉ.शशिकांत गाजरे, शांती दमानी प्रमुख अतिथी होते. यशस्वीतेसाठी डॉ.अमित तळेले, डॉ.गजानन पाटील, डॉ.व्ही.ए.नेमाडे व सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.
पुरस्कार वितरण
जळगाव- समता शिक्षक परिषदेतर्फे ७ रोजी दुपारी १२.३० ते ४.३० वाजता अल्पबचत भवनात गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे संस्थापक डी.के.अहिरे, अंनिसचे राज्य सरचिटणीस हमीद दाभोळकर, शिक्षण संचालक महावीर माने, उपसंचालक भगवान सूर्यवंशी, प्राचार्य अनिल झोपे, आय.सी.शेख, शिक्षणाधिकारी देवीद९ास महाजन आदी उपस्थित राहतील.
भुसावळ बोदवडबसबाबत मागणी
जळगाव- भुसावळ आगारातून रात्री ८.१० वाजता सुटणारी भुसावळ-बोदवड एसटी बस कायमस्वरुपी सुरू ठेवावी, अशी मागणी प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ही बस काही दिवसांपूर्वी कुठलीही पूर्वसूचना न देता बंद करण्यात आली. यामुळे प्रवाशांना खाजगी बसने नाइलाजाने जावे लागते. बोदवड विभागाचे चांगले उत्पन्न असतानाही अनेक बसफेर्‍या अचानक रद्द केल्या जातात, असेही निवेदनात म्हटले आहे.
सहकार मंत्र्यांचा दौरा
जळगाव- सहकारमंत्री चंद्रकांत पाटील हे ३ रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहे. ते ३ रोजी पहाटे ४ वाजून ५८ मिनिटांनी चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर मुंबई सीएसटी येथून अमृतसर एक्सप्रेसने पोहोचतील. तेथून धुळे येथे शासकीय वाहनाने प्रयाग करतील. सायंकाळी ६ वाजता ते धुळे येथून चाळीसगावकडे येतील.
पुणतांबेकर यांना आदरांजली
जळगाव- जे.के.स्कूल, मोहाडी रोड येथे साहित्यिक डॉ.शंकर पुणतांबेकर यांना आदरांजली वाहण्यात आली. कृष्णा श्रीवास्तव यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.