शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रालोद की मूंछ, या भाजपा की पूंछ!

By admin | Updated: February 17, 2017 00:49 IST

‘रालोद की मूंछ बनोगे... या भाजपा की पूंछ बनोगे?’ हे घोषणा आहे, अजितसिंग यांच्या राष्ट्रीय लोकदल पक्षाची. जाट मतदारांचा प्रभाव

सुरेश भटेवरा / हरदोई‘रालोद की मूंछ बनोगे... या भाजपा की पूंछ बनोगे?’ हे घोषणा आहे, अजितसिंग यांच्या राष्ट्रीय लोकदल पक्षाची. जाट मतदारांचा प्रभाव असलेले अनेक मतदारसंघ पश्चिमी उत्तर प्रदेशात आहेत मात्र समाजवादी आणि काँग्रेसच्या आघाडीत शिरण्याची संधी न मिळाल्यामुळे अजितसिंगांनी राज्यभरात ३00 हून अधिक उमेदवार उभे केले आहेत.लोकसभा निवडणुकीत बहुतांश जाट समाज मोदींच्या पाठिशी उभा राहिला. त्याचा फायदा झाला. आता जाटांनी भाजपाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. जाटांचे नेते यशपाल मलिक म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदी आणि भाजपाने विश्वासघात केला. लोकसभेवेळी दिलेले आरक्षणापासून मुजफ्फरपूर दंगलीतल्या दोषींना शिक्षा करण्यापर्यंतचे एकही आश्वासन पूर्ण केले नाही. हरयाणा हेही जाटांची बहुसंख्या असलेले राज्य. तिथेही जाट नेत्याला मुख्यमंत्री केले नाही. निवडणुकीच्या तोंडावर जाट महासभेने भाजपाला जाब विचारण्यास रॅलीचे आयोजन केले, तेव्हा पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्यासह सारेच नेते जागे झाले. पण जाटांची समजूत घालण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना यश आले नाही. भाजपाकडून मुखभंग झाल्यामुळे जाट अस्मितेचे अंगार प्रज्वलित झालेत. भाजपाने कैरानातील हिंदुंचे पलायन आणि लव्ह जिहादसारखे मुद्दे तापवले. मात्र त्यातली हवा निघून गेली आहे. मुजफ्फरपूरच्या दंगलीची धग मात्र कायम असल्याने मुस्लीम हितरक्षणाचा झेंडा फडकावणाऱ्या समाजवादी पक्षालाही जाट जवळ करणार नाहीत. मग ही मते कोणाला मिळणार? जाट मतदानाचा आजवरचा पॅटर्न लक्षात घेता ते एकदा अजितसिंगांना मतदान करतात आणि पुढल्या निवडणुकीत रालोदला अंगठा दाखवतात. आता अजितसिंगांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दंगलीचा आरोप असलेले भाजपा आमदार संगीत सोम व सुरेश राणा यांच्या विरोधात रालोदने मुस्लीम तर सपाने जाट उमेदवार उतरवल्याने ते अडचणीत आहेत.