शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

रोहतकमध्ये बलात्कारानंतर तरुणीची निर्घृण हत्या

By admin | Updated: February 8, 2015 18:52 IST

अज्ञात नराधमांनी २८ वर्षाच्या मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीची बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना रोहतकमध्ये घडली असून बलात्कारानंतर नराधमांनी पिडीत तरुणीच्या गुप्तांगामध्ये छोटी खडी टाकली होती.

ऑनलाइन लोकमत
रोहतक (हरियाणा), दि. ८ - दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणासारखीच अंगावर शहारे आणणारी घटना रोहतकमध्ये घडली आहे. अज्ञात नराधमांनी २८ वर्षाच्या मानसिक रुग्ण असलेल्या तरुणीची बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना रोहतकमध्ये घडली असून बलात्कारानंतर नराधमांनी पिडीत तरुणीच्या गुप्तांगामध्ये छोटी खडी टाकून ठेवल्याचे समोर आले आहे. या संतापजनक घटनेची दखल महिला आयोगाने घेतली असून महिला आयोगाने रोहतक पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. 
नेपाळमध्ये राहणारी २८ वर्षीय तरुणी हरियाणातील रोहतकमध्ये राहणा-या तिच्या बहिणीकडे आली होती. तिला मानसिक आजार असून यासाठी तिच्यावर उपचारही सुरु होते.संबंधीत तरुणी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. तीन दिवसांपूर्वी तिचा मृतदेह रोहतकमधील ग्रामीण भागातील निर्जन ठिकाणी आढळला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पंडित भगवत दयाल शर्मा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे पाठवला. या शवविच्छेदनातून अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नराधमांनी पिडीत तरुणीवर बलात्कार केला व यानंतर तिची हत्या केली. हत्येपूर्वी नराधमांनी तिच्या गुप्तांगात काठी, छोटी खडी टाकण्याचे अत्यंत निर्घृण कृत्यही केले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे शवविच्छेदन करणे कठीण होते,  माझ्या आजवरच्या कारकिर्दीत ऐवढे अघोरी कृत्य मी कधीच बघितले नव्हते असे डॉ. एस.के. धत्तेरवाल यांनी सांगितले. धत्तेरवाल यांनी आत्तापर्यंत सुमारे ३० हजार ऑटोप्सी केल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यावर पोलिसांनी अज्ञात नराधमांविरोधात बलात्कार, हत्या, अनैसर्गिक संभोग अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. नराधमांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकं तयार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दिल्लीतील निर्भया बलात्कारप्रकरणातही नराधमांनी असे क्रूरकृत्य केले होते. रोहतकमधील घटनेने निर्भया प्रकरणाची जखम ताजी केली आहे.