शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रॉबर्ट वाड्रावरील आरोप राजकीय आकसापोटी - काँग्रेस

By admin | Updated: April 29, 2017 18:48 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी 2008 मध्ये हरियाणातील जमीन व्यवहारात 50.5 कोटी रुपयांचा अवैध नफा कमावल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 29 -  काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी 2008 मध्ये हरियाणातील जमीन व्यवहारात 50.5 कोटी रुपयांचा अवैध नफा कमावल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे. याप्रकरणी भूमिका मांडण्यासाठी काँग्रेस पार्टीकडून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर निशाणा साधण्यात आला.  
 
यावेळी, "राजकीय दुश्मनी काढण्यासाठी भाजपा इतक्या खालच्या स्तरापर्यंत पोहोचेल, यावर विश्वास बसत नाही", असा आरोप काँग्रेसने आयोजित पत्रकार परिषदेत भाजपावर केला आहे.   
 
शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, "भाजपा विरोधकांच्या भूमिकेत असताना त्यांच्या कित्येक नेत्यांविरोधात पुरावे होते, भाजपा नेत्यांच्या नातेवाईकांविरोधात पुरावे होते, मात्र आम्ही कधीही त्यांचा छळ केला नाही". 
 
"आम्हाला हेदेखील माहिती होते कोणते उद्योगपती भाजपाला पाठिंबा देत आहेत आणि त्यांच्या पार्टीला फंड देतात. मात्र काँग्रेसनं कधीही त्यांच्याविरोधात छापेमारी सत्र चालवले नाही. भाजपाकडून राजकीय आकसापोटी हा सर्व प्रकार सुरू आहे", असा आरोपही यावेळी आझाद यांनी केला. 
 
(वाड्रा यांनी बेकायदा ५० कोटी कमावल्याचा दावा)
दरम्यान,  काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी २००८ मध्ये हरियाणातील जमीन व्यवहारात ५०.५ कोटी रुपयांचा अवैध नफा कमावला होता. एका इंग्रजी वृत्तपत्रात हा दावा करण्यात आला आहे. या व्यवहारासाठी दमडीही खर्च न करता वाड्रा यांनी नफा कमावल्याचे जस्टिस एस. एन. ढिंगरा आयोगाने मान्य केले.
 
वाड्रा यांच्या कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी हातमिळवणी करण्यात आली होती. आयोगाने वाड्रा आणि त्यांच्या कंपन्यांच्या जमीन खरेदीची चौकशी करण्याची मागणी केली आहे, असे या वृत्तात म्हटले आहे. ढिंगरा आयोगाच्या अहवालाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. वाड्रा यांचे वकील सुमन खेतान यांनी वृत्तपत्राला सांगितले की, आपले पक्षकार आणि त्यांच्या कंपन्यांनी काहीही चुकीचे केलेले नाही, तसेच कायद्याचे उल्लंघनही झालेले नाही.
 
बाजारमूल्य दिल्यानंतर जमीन खरेदी करण्यात आली, तसेच आयकरही भरण्यात आला. हरियाणातील भाजप सरकारने वाड्रा यांच्या जमीन व्यवहारांची चौकशी करण्यासाठी २०१५ मध्ये ढिंगरा आयोगाची स्थापना केली होती. वाड्रा आणि त्यांची कंपनी स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीने गुरगाव येथे बेकायदेशीररीत्या जमिनीचे खरेदी व्यवहार केल्याचा आरोप आहे. वाड्रा यांनी हे आरोप फेटाळले आहेत. राजकीय सुडापोटी आपले नाव गोवले जात असल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले.