बॉटनिकल गार्डनमध्ये तरुणांना लुटले
By admin | Updated: February 7, 2015 02:05 IST
नागपूर : बॉटनिकल गार्डनमध्ये दोन तरुणांना मारहाण करून तीन लुटारूंनी त्यांच्याजवळून पैसे आणि मोबाईल हिसकावून नेला.
बॉटनिकल गार्डनमध्ये तरुणांना लुटले
नागपूर : बॉटनिकल गार्डनमध्ये दोन तरुणांना मारहाण करून तीन लुटारूंनी त्यांच्याजवळून पैसे आणि मोबाईल हिसकावून नेला. शेख तौफिक शेख मेहबूब (वय २४, रा. सतरंजीपुरा) हा आपल्या मित्रासोबत मंगळवारी सकाळी बॉटनिकल गार्डनमध्ये फिरत असताना तीन आरोपी त्यांच्याजवळ आले. पैसे दे, वर्ना मार डालेंगे, असे म्हणत आरोपींनी त्यांच्याकडून ५० रुपये आणि मोबाईल हिसकावून पळ काढला. तौफिकच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.----