शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत विद्यार्थ्याचे अपहरण करून लूट

By admin | Updated: July 11, 2015 00:15 IST

पेठरोडवरील घटना : चालत्या रिक्षातून उडी घेऊन विद्यार्थ्याने वाचविले स्वत:चे प्राण

पेठरोडवरील घटना : चालत्या रिक्षातून उडी घेऊन विद्यार्थ्याने वाचविले स्वत:चे प्राण
नाशिक : मित्राला मारण्याची सुपारी दिल्याचे कारण सांगत विद्यार्थ्याचे रिक्षातून अपहरण करून लुटल्याचा प्रकार पंचवटीतील पेठरोड परिसरात शुक्रवारी (दि़१०) सकाळी घडला़ या विद्यार्थ्याने प्रसंगावधान राखत चालत्या रिक्षातून उडी घेत स्वत:चे प्राण वाचवले असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरण व लुटीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़
धात्रक फाटा परिसरात राहणारा मितेश विजय गावित हा शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास इंद्रकुंड परिसरात खासगी शिकवणीसाठी गेला होता़ त्यास शिक्षक पवन जोशी यांनी काही कागदपत्रांच्या छायांकित प्रती काढण्यासाठी पाठविले़ त्यानुसार छायांकित प्रती घेऊन येत असताना त्यास एका संशयिताने अडवले व तुझ्या मित्राला मारण्याची सुपारी दिल्याचे सांगून पाठीला चाकू लावला व बळजबरीने रिक्षात बसविले़
यानंतर रिक्षा पेठरोडच्या दिशेने नेऊन मितेशच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोन्याची पोत हिसकावून घेत वडीलांचा मोबाईल नंबर मागीतला़ या प्रसंगातही मितेशने धारिष्ट्य दाखवत चालत्या रिक्षातून उडी घेऊन पंचवटी पोलीस ठाणे गाठून अधिकार्‍यांना आपबिती सांगितली़ तसेच त्याने सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी एमएच १५, एके ६११० या रिक्षासह चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे़ दरम्यान मितेश हा इगतपुरीच्या आमदार निर्मला गावीत यांचा जवळचा नातेवाईक असल्याचे वृत्त आहे़(प्रतिनिधी)