शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना लुटारू मानेना

By admin | Updated: December 8, 2015 01:52 IST

कोतवाली, इमामवाड्यात चेनस्नॅचिंग

कोतवाली, इमामवाड्यात चेनस्नॅचिंग
नागपूर : अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी उपराजधानीत आलेल्या हजारो पोलिसांना न जुमानता उपराजधानीत लुटारूंनी आपला हैदोस सुरूच ठेवला आहे. सोमवारी अवघ्या अर्ध्या तासात दोन महिलांचे दागिने हिसकावून नेले.
चंदननगर पीटीएस क्वॉर्टरमधील रहिवासी शीला संदन भौमिक (वय ३६) या सोमवारी दुपारी ११.४५ ला आपल्या मुलीला रायसोनी कॉलेजला सोडून ॲक्टिव्हाने घरी परत जात होत्या. मोटरसायकलने आलेल्या दोन लुटारूंनी शीला यांच्या गळ्यावर थाप मारून त्यांच्या गळ्यातील २५ हजारांची सोन्याची साखळी हिसकावून नेली. इमामवाडा पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.
या घटनेच्या अर्ध्या तासानंतर नैना नारायणराव भाके (वय ५२, रा. सेंट्रल एव्हेन्यू भावसार चौक) या पायी घरी जात होत्या. चितार ओळीत पल्सरवर आलेल्या दोन लुटारूंनी नैना यांच्या गळ्यावर थाप मारून त्यांच्या गळ्यातील ६० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. कोतवाली पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. या दोन्ही गुन्ह्यातील साम्य बघता एकाच आरोपींनी त्या केल्या असाव्यात, असा पोलिसांचा कयास आहे.
---
विष घेऊन आत्महत्या
नागपूर : नरेंद्रनगरातील नगर विकास सोसायटीत राहणारे विनय रामप्रकाश बिटले (वय ३२) यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. विनय यांच्या आत्महत्येमागचे कारण पोलीस शोधत आहेत.
---
नंदनवनमध्ये तरुणाने जाळून घेतले
नागपूर : नंदनवनमधील एका तरुणाने स्वत:ला पेटवून घेतले. शेषनगरात सोमवारी दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. अतुल अशोक काटीले (वय ३०) असे गंभीररीत्या जळालेल्या तरुणाचे नाव आहे.
तो नंदनवनच्या शेषनगरात राहत होता. अचानक दुपारी ३ च्या सुमारास अतुल ज्वाळाने वेढलेल्या अवस्थेत किंचाळत असल्याचे शेजाऱ्यांना दिसले. शेजाऱ्यांनी लगेच धाव घेऊन त्याला विझविले. मात्र, अतुल ५० ते ६० टक्के भाजला होता. त्याला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. अतुलने नेमके कोणत्या कारणामुळे स्वत:ला पेटवून घेतले, ते स्पष्ट होऊ शकले नाही.
--