शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमध्ये मोदींचा 10 किलोमीटरपर्यंत रोड शो

By admin | Updated: April 16, 2017 22:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गुजरातमधल्या सुरतमध्ये भाजपानं 10 किलोमीटरपर्यंत रोड शो काढला आहे.

ऑनलाइन लोकमतअहमदाबाद, दि. 16 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात गुजरातमधल्या सुरतमध्ये भाजपानं 10 किलोमीटरपर्यंत रोड शो काढला आहे. विशेष म्हणजे भाजपाचा हा रोड शो अडीच तासांत पूर्ण करण्यात आला. पंतप्रधानांनी रोड शो दरम्यान हात उंचावून जनतेला अभिवादन केले. रोड शोच्या वेळी महिलांनी आकर्षक कपडे परिधान केल्याचं पाहायला मिळालं. गुलाबी रंगाचं टी-शर्टमध्ये 90 महिला बायकर्सच्या ताफ्याचा लवाजमा मोदींच्या गाडीभोवताली होता.रोड शोमध्ये 25 हजार बाईकवर 50 हजार लोक मोदींच्या मागोमाग होते. रोड शोनंतर मोदी सर्किट हाऊसमध्ये दाखल झालेत. आज रात्री ते येथेच वास्तव्याला राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 400 कोटी रुपयांच्या किरण मल्टी सुपर स्पेशॉलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचं उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर मोदी इच्छापूर गावाला भेट देणार असून, तिथल्या एका पॉलिशिंग युनिटचंही उद्घाटन करणार आहेत. गुजरातमधील अनेक प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार असून, त्यानंतर ते पुन्हा दिल्लीत दाखल होणार आहेत.(ट्रिपल तलाकमुळे मुस्लिम महिला त्रस्त- नरेंद्र मोदी)तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, देशात असहिष्णुता वाढल्याचं कारण देत पुरस्कार परत करणारे कलाकार आणि साहित्यिक आता कुठे आहेत. विरोधक प्रत्येक निवडणुकीच्या वेळी एक नवा मुद्दा उखरून काढत होते. बिहार निवडणुकांच्या आधी पुरस्कार परत करण्यात आले होते. सध्या पुरस्कार परत करणारे कुठे आहेत ?, त्यानंतर दिल्लीत चर्चवर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आता ईव्हीएम मशिनमध्ये गडबड असल्याचा मुद्दा उचलला जातोय. मला वाटतं विरोधकांकडे नवे मुद्दे जन्माला घालण्याचा कारखाना आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुरस्कार परत करणारे कलाकार आणि साहित्यिकांसोबतच विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये मिळालेला विजय हा ऐतिहासिक असल्याचं म्हणत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला आहे.