शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

होंडातर्फे रस्ते सुरक्षा सप्ताह, देशभरात जनजागृती मोही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 05:23 IST

सुरक्षित वाहतुकीसाठी कटिबद्ध असलेल्या होंडा मोटारसायकल अ‍ॅण्ड स्कूटर इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय स्तरावर रस्ते सुरक्षा सप्ताह पाळण्यात येत आहे.

नवी दिल्ली - सुरक्षित वाहतुकीसाठी कटिबद्ध असलेल्या होंडा मोटारसायकल अ‍ॅण्ड स्कूटर इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या वतीने ४ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय स्तरावर रस्ते सुरक्षा सप्ताह पाळण्यात येत आहे. भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने विनाअपघात वाहतुकीसाठी चालविलेल्या प्रयत्नांचे महत्त्व या सप्ताहामध्ये लोकांच्या मनावर ठसविण्यात येत आहे.दुचाकी चालविताना हेल्मेट वापरा, असा संदेशही होंडातर्फे देण्यात येत आहे. हा रस्ते सुरक्षा सप्ताह यशस्वी करण्यासाठी होंडाचे ९८६ डीलर, ४ मॅन्युफॅक्चरिंग प्लांट, १६ विभागीय कार्यालये, ४ प्रादेशिक कार्यालये येथील कर्मचारीवर्ग अथक परिश्रम घेत आहे. या सप्ताहानिमित्त कंपनीने ठाणे, येवले यासह १३ ठिकाणी असलेल्या आपल्या ट्रॅफिक पार्कमध्ये विशेष कार्यक्रमांचेही आयोजन केले.पुण्यात कार्यशाळाजयपूरमध्ये रस्ते सुरक्षाविषयक तीन दिवसांच्या कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते. तर पुण्यात महाविद्यालयीन युवकांना सुरक्षित वाहतुकीचे महत्त्व कळण्यासाठी सेफ सायकलिंग कार्यशाळा पार पडली. आम्ही वाहननिर्मिती करताना प्रत्येकासाठी सुरक्षित प्रवास हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवतो, असे होंडा मोटारसायकल व स्कूटर इंडियाचे ब्रँड व कम्युनिकेशन विभागाचे उपाध्यक्ष प्रभू नागराज यांनी सांगितले. लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, स्कूलबसच्या चालकांसाठी कार्यशाळा, ९ ते १२ वयोगटातील मुलांसाठी सायकलिंगचे प्रशिक्षण शिबिर असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत. (वाणिज्य प्रतिनिधी)

टॅग्स :New Delhiनवी दिल्ली