सूरजकुंड (हरियाणा) : नवनिर्वाचित भाजपा खासदारांसाठी येथे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या आजच्या (रविवार) दुस:या व अखेरच्या दिवशी प्रामुख्याने सोशल मीडियाच्या वापरावर चर्चा झाली़ सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी भाजपाला दिशा देणा:या संघाच्या विचारधारेबाबत पक्ष खासदारांना माहिती दिली़
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि प्रकाश जावडेकर यांनी सोशल मीडिया आणि मीडियाशी संबंधित अनेक मुद्यांवर खासदारांचा ‘क्लास’ घेतला़ सोशल मीडिया आधुनिक युगाचे वरदान असल्याचे गोयल म्हणाल़े पण याचा दुरुपयोग झाल्यास तो घातकही आहे, असेही त्यांनी बजावल़े सोशल मीडियाद्वारे अंतर्गत मतभेद मांडू नका़ त्याचा सक्रिय पण विवेकी वापर करा, असे त्यांनी सांगितल़े राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुरेश सोनी यांनीही संघाच्या विचारधारा स्पष्ट करताना, देशाला नव्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा यावेळी बोलून दाखवल्या़ (वृत्तसंस्था)
‘आम्ही जे बोलत होतो, तेच अँटोनी आता सांगत आहेत’
4काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेबाबतच्या धोरणासंदर्भात पक्ष नेते ए़ के.अँटोनी यांनी दिलेला सल्ला स्वागतार्ह आह़े आम्ही अनेक वर्षापासून हे म्हणत होतो़ अँटोनी आत्ता कुठे खरे बोलले, अशा उपरोधिक शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी काँग्रेसवर तोफ डागली़
4रविवारी येथे भाजपाच्या नवनिर्वाचित खासदारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपीय भाषणात ते बोलत होत़े काँग्रेसने आपल्या धर्मनिरपेक्षता धोरणाबाबत आत्मपरीक्षण करायला हवे, असा घरचा अहेर अँटोनी यांनी दिला होता़ हाच धागा पकडून अडवाणींनी काँग्रेसवर हल्ला चढवला़
पहिल्याच सामन्यात मोदींचे त्रिशतक
अडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तोंडभरून स्तुती केली़ पहिल्याच सामन्यात कर्णधारपदासह त्रिशतक ठोकणारा मोदींसारखा खेळाडू मी पाहिला नाही, असे अडवाणी म्हणाल़े लोकसभा निवडणुकीत रालोआला मिळालेल्या 3क्क् पेक्षा अधिक जागांच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी हे विधान केल़े 2क्क्4 मध्ये पराभव झाल्यानंतर भाजपा पुन्हा सत्तेत यावी, हे स्वपA मी उराशी बाळगून होतो, असे ते म्हणाले.