शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅट्रॉसिटी’साठी आता कठोर कारवाई

By admin | Updated: January 26, 2016 02:28 IST

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांवर अत्याचार करणे आणि त्यांच्याविरुद्ध सामाजिक किंवा आर्थिक बहिष्कारासह त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारी कोणतीही अवमानजनक कृती

नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांवर अत्याचार करणे आणि त्यांच्याविरुद्ध सामाजिक किंवा आर्थिक बहिष्कारासह त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणारी कोणतीही अवमानजनक कृती करणाऱ्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची तरतूद असलेला नवा कायदा मंगळवारपासून देशात लागू करण्यात येत आहे.अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचाराचा प्रतिबंध) (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) दुरुस्ती कायदा २०१५ या नव्या कायद्यानुसार आता अनुसूचित जाती आणि जमातीच्या सदस्याचे मुंडन करणे, मिशी कापणे किंवा त्यासमान एखादी त्यांची प्रतिष्ठा कमी करणारी कृती अत्याचाराचा गुन्हा मानली जाईल. याशिवाय अनुसूचित जाती आणि जमातीच्या सदस्यांना सिंचनाच्या सोयी किंवा वन अधिकार नाकारणे, गळ्यात चपलांची माळ घालणे, कबर खोदणे अथवा जनावराचा मृतदेह वा अवशेष वाहून नेणे आणि त्यांची विल्हेवाट लावण्याची सक्ती करणे, मलमूत्र वाहून नेण्यासाठी बाध्य करणे, अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिलांना देवदासी बनविणे आणि जातीच्या नावावर त्यांना शिवी देणेही गुन्हा समजण्यात येईल.सामाजिक अथवा आर्थिक बहिष्कार घालणे, अनुसूचित जाती, जमातीच्या महिलेच्या अंगावरील दागिने वा अंगवस्त्र काढून तिला दुखावणे, अनुसूचित जाती आणि जमातीच्या सदस्याला घर किंवा गाव सोडण्यास भाग पाडणे आणि लैंगिक स्वरूपाचे हावभाव वा कृतीदेखील अत्याचाराचा गुन्हा मानला जाईल. यासोबतच एखाद्या ठराविक उमेदवाराला मतदान करण्यासाठी वा मतदान न करण्यासाठी दबाव टाकण्याचाही अत्याचाराच्या गुन्ह्यात समावेश करण्यात आला आहे. ‘इजा, गंभीर इजा पोहोचविणे, धमकावणे, अपहरण यासारख्या किमान दहा वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद असलेल्या काही गुन्ह्यांनाही या नव्या कायद्याअंतर्गत शिक्षापात्र गुन्हा मानले जाईल, असे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचाराचा प्रतिबंध) दुरुस्ती कायदा २०१५ हा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचाराचा प्रतिबंध) कायदा १९८९ चे स्थान घेईल.(लोकमत न्यूज नेटवर्क)