शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इन रिलेशनमधून होणाऱ्या मुलांना पोटगी मिळविण्याचा अधिकार-पंजाब हायकोर्ट

By admin | Updated: July 1, 2017 14:08 IST

लिव्ह इन रिलेशनमधून होणाऱ्या मुलांना पोटगीचा हक्क असल्याचं पंजाब हायकोर्टाने म्हंटलं आहे.

ऑनलाइन लोकमत

चंदीगड, दि. 1- "लिव्ह इन रिलेशन ही असाधारण गोष्ट नाही. या रिलेशनशिपमधून होणाऱ्या मुलांनासुद्धा विवाहीत दांपत्याकडून होणाऱ्या मुलांप्रमाणे पोटगी मिळविण्याचा अधिकार आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय पंजाब व हरियाणा हायकोर्टाने दिला आहे. कोर्टाच्या म्हणण्यानूसार, लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेलासुद्धा पोटगी मिळविण्याचा अधिकार आहे. 
गुरूग्राममध्ये एक जोडपं 2007 सालापासून लिव इन रिलेशनमध्ये राहत होतं. त्यांना 2011 मध्ये एक मुलगा झाला. या प्रकरणातील महिलेने तिच्या जोडीदारावर आरोप केला आहे. आपण घटस्फोटीत असल्याचं त्या महिलेच्या प्रियकराने सांगितलं होतं. तसंच याचिकाकर्त्या महिलेशी लग्न करणार असल्याचंही त्यांने सांगितलं होतं. महिलेला वचन दिल्यानंतर त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याचं सांगितलं होतं. पण त्यानंतर लग्नाचं वचन देणाऱ्या तिच्या प्रियकराने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नसल्याचं समजलं. 
 
लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर जेव्हा त्या माणसाने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा आपली फसवणूक झाल्याचं त्या महिलेच्या लक्षात आलं. नंतर तिने या प्रकरणी कोर्टात धाव घेतली होती. या महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने लिव इन रिलेशन असाधारण नसल्याचं सांगितलं. तसंच लिव्ह इनमधून होणाऱ्या मुलाला पोटगी मिळविण्याचा अधिकार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. या सुनावणी दरम्यान कोर्टाने लिव्ह इनमधून झालेल्या मुलाला दहा हजार रूपये तर त्या महिलेला 20 हजार रूपये पोटगी दिली जावी, असा निर्णय दिला.  या प्रकरणातील पुरूषाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान देत आपलं लग्न झालं आहे हे महिलेला माहिती असल्याचं कोर्टाला सांगितलं. तसंच ती महिला मोठी रक्कम घेऊन वेगळी झाली आहे, त्यामुळे आता पोटगीसाठीची रक्कम रद्द करावी, अशी मागणीही त्याने केली. 
 
पंजाब हायकोर्टाने पोटगी संबंधातील कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला योग्य ठरवलं आहे. "आजच्या काळात लिव्ह इन रिलेशनचे नातेसंबंध स्वीकारले जात आहेत. समाजात बदलही येतो आहे. त्यामुळे पोटगी मिळविण्याचा अधिकार लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलेला आणि तिच्या मुलाला मिळायला हवा", असं न्यायमूर्ती जयश्री ठाकूर यांनी सांगितलं आहे.