शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

रेल्वेला बसविणार आर-पार काचांचे छत; पर्यटनाला मिळणार उभारी

By admin | Updated: October 12, 2016 06:05 IST

धुरांच्या रेषा हवेत सोडणाऱ्या रेल्वेच्या जागी आलेल्या डिझेल इंजिनसोबत विजेवर चालणाऱ्या इंजिनमुळे रेल्वेचा प्रवास सुखदायी करणारी भारतीय रेल्वे आता नव्याने कात टाकत

नवी दिल्ली : धुरांच्या रेषा हवेत सोडणाऱ्या रेल्वेच्या जागी आलेल्या डिझेल इंजिनसोबत विजेवर चालणाऱ्या इंजिनमुळे रेल्वेचा प्रवास सुखदायी करणारी भारतीय रेल्वे आता नव्याने कात टाकत विदेशी पर्यटकांसोबत भारतीय प्रवाशांसाठी रेल्वेप्रवास अधिक आरामदायी होणार आहे. आता रेल्वे प्रवाशांना खिडकीतून न डोकावता बसल्या जागी आकाशासोबत आजूबाजूचा निसर्ग न्याहाळण्याची पर्वणी मिळणार आहे. यासाठी भारतीय रेल्वे बिलोरी छत असलेले डबे रुळावरून दौडविण्याचा इरादा पक्का केला असून त्याच्या दृष्टीने तयारीही केली आहे. पर्यटनाला उभारी देणे, हाच भारतीय रेल्वेचा उद्देश आहे.स्वीत्झर्लंडप्रमाणे आता भारतात बिलोरी छतांच्या डब्यातून आजूबाजूचे निसर्गसौंदर्य आणि आकाशातील विहंगम दृश्य न्याहळता येणार आहे. विशेष म्हणजे हे बिलोरी छतांचे डबे अद्ययावत माहिती-मनोरंजन सुविधांनी सज्ज असतील. भारतीय रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन आणि रिसर्च डिझाईन्स अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन व इंटिग्रल कोच फॅक्टरी (पेरुम्बदूर) यांच्या संयुक्त विद्यमाने हे आरामशीर बिल्लोरी डबे तयार करण्यात येत असून, डिसेंबर २०१६ मध्येच बिलोरी छतांच्या रेल्वे डब्यांचे (ग्लास सिलिंग कोचेस) अवतरण करण्यात येणार आहे. तथापि, हवाई निरीक्षणाची सुविधा असलेली स्पेशल ट्रेन चालविण्याबाबतचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे. बिलोरी डब्यांची पहिली रेल्वे सर्वप्रथम काश्मीर खोऱ्यात धावणार असून, जम्मू-काश्मीर खोऱ्यातून नियमित धावणाऱ्या रेल्वेला हा डबा जोडला जाणार आहे. तसेच अन्य दोन बिलोरी डबे आराकू खोऱ्यात (विशाखापट्टणम) धावणार आहेत. स्वीत्झर्लंडसह काही देशांत अशा डब्यांची रेल्वे पर्यटकांच्या पसंतीला उतरली आहे. भारतातही यामुळे रेल्वे पर्यटनाला नवी उभारी मिळेल, असा विश्वास आहे, असे आयआरसीटीसीचे व्यवस्थापकीय संचालक ए.के. मनोचा यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)अशी आहेत रेल्वेची वैशिष्ट्य...आरपार छताचा पहिला डबा आॅक्टोबरमध्ये तयार होणारअद्ययावत माहिती-मनोरंजन सुविधांनी सज्जआरामशीर प्रवासासाठी भरपूर मोकळी जागाचेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत उत्पादनएका डब्याचा खर्च ४ कोटी रुपये३६० कोनातून फिरणाऱ्या खुर्चीमुळे प्रवाशांना आकाश न्याहळता येईल.