शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दरवाढीचा डोस 509 औषधे महाग

By admin | Updated: April 9, 2015 04:39 IST

साध्या सर्दी-खोकला, तापाच्या आजारापासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांसाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या तब्बल ५०९ औषधांच्या किमतीमध्ये किमान दीड

नवी दिल्ली : साध्या सर्दी-खोकला, तापाच्या आजारापासून कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांसाठी आवश्यक मानल्या जाणाऱ्या तब्बल ५०९ औषधांच्या किमतीमध्ये किमान दीड रुपयापासून कमाल १,६०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली असून, नवे दर एक एप्रिलपासून लागू झाले आहेत. या अचानक औषध दरवाढीमागचे कारण मात्र कच्चा मालातील वाढ अथवा संशोधन खर्चातील वाढ हे नसून, याचा संबंध थेट महागाईशी जोडला गेला आहे. देशामध्ये महागाई मोजण्यासाठी आधार घेण्यात येणाऱ्या घाऊक मूल्यांक वार्षिक निर्देशांकाशी औषधांच्या किमती जोडण्यात आल्या असून, या निर्देशांकात वर्षाखेरीस होणाऱ्या हालचालींचे प्रतिबिंब औषधांच्या किमतीवर पडणार आहे. टक्केवारीत ही वाढ ३.८४ टक्के इतकी किरकोळ दिसत असली तरी मधुमेह, कर्करोग आणि कावीळ या आणि यासारख्या काही आजारांवरील औषधांच्या किमती आताच महाग असल्याने त्यावर ही नवी आकारणी होणार असल्याने यांच्या किमतीत अधिक वाढ होईल. राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाच्या अधिसूचनेनुसार, २०१३ च्या तुलनेत २०१४ मध्ये घाऊक मूल्यांक वार्षिक निर्देशांक ३.८४ टक्क्यांनी वाढला आहे. त्यानुसार नवी आकारणी करण्यात येत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)