शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

रायसोनी पतसंस्थेच्या मालमत्तेवर टाच!

By admin | Updated: March 25, 2015 23:53 IST

सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्यासंदर्भात सर्व संचालकांची सुनावणी घेऊन पतसंस्थेसह व संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी बुधवारी दिले.

रघुनाथ पांडे - नवी दिल्लीजळगावात मुख्यालय असलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्य सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्यासंदर्भात सर्व संचालकांची सुनावणी घेऊन पतसंस्थेसह व संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी बुधवारी दिले. तर, केंद्रीय सहकार विभागाने पतसंस्था बंद करण्याचा इशारा पतसंस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिला आहे. मल्टिस्टेट को-आॅप. सोसायटी कायदा २००२ नुसार मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश लवकरच काढण्यात येणार असून सध्या पतसंस्थेचे संचालक अटकेत असल्याने त्यांची सुनावणी दिल्लीत घेण्याची प्रक्रिया कशी असेल, त्यावरही विधि विभागाचे मत मागविण्यात येत आहे, असे अधिकृत सूत्राने सांगितले. शिवाय केंद्रीय सहकार विभागाने पतसंस्थेच्या प्रबंध संचालकांना तीन मार्च रोजी नोटीस देऊन ठेवीदारांना त्यांची रक्कम १५ दिवसांत परत करण्याचे सांगून तसे न केल्यास पतसंस्था बंद (वार्इंडअप) करण्याची कारवाई केली जाईल, असे पत्र दिले आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, नाबार्ड, पुण्याचे सहकार सहायक निबंधक, दोन खासदार यांच्यासह जळगाव, सातारा, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती, नांदेड, परभणी, सोलापूर येथील तब्बल २२१ तक्रारकर्त्यांनी या पतसंस्थेच्या गैरव्यवहाराबद्दल गेल्या तीन महिन्यांत पत्रे दिली. त्यातून हा घोटाळा १२ हजार कोटींवर असल्याचे कृषिविभागातील सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत लक्षात आल्याने बुधवारी कृषिमंत्री सिंह यांनी बुधवारी ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखण्याच्या सूचना देत पंतसंस्था अवसायनात टाकून त्यावर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू करा,अशी ताकीद दिली. सहकार विभागाचे कायदा संचालक पी. संपथ व केंद्रीय सहकार विभागाचे उपसंचालक जितेंदर नागर यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे लोकांचा कष्टाचा पैसा पतसंस्थेत अडल्याने त्यांच्यावर काय परिस्थिती ओढवली असेल याचा अंदाज येणार नाही, त्यामुळे खातेदारांची रक्कम तातडीने मिळावी, यासाठी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या. ४भाईचंद हिराचंद रायसोनी बहुराज्य सहकारी पतसंस्थेतील घोटाळ््यासंदर्भात कारवाई करण्यासाठी तसेच ठेवीदाराना त्यांची रक्कम परत मिळण्यासाठी केंद्र सरकाने हस्तक्षेप करावा या मागणीसाठी पंतसंस्थेचे खातेदार सतीश बोधनकर, विजय मनुरकर, राजेश उत्तरवार यांच्यासह काही ठेवीदार राजधानीतील जंतरमंतर येथे २६ मार्चासून उपोषण करणार आहेत.