शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

केंद्राचा माघारयोग!

By admin | Updated: June 10, 2015 04:34 IST

अल्पसंख्याक गटांच्या उफाळून आलेल्या विरोधापुढे केंद्राने साष्टांग नमस्कार घालत सूर्यनमस्कार वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

योगदिनातून सूर्यनमस्कार बाद : सक्ती नसल्याचा गृहमंत्री राजनाथसिंह यांचा खुलासानवी दिल्ली : मोदी सरकारच्या पुढाकारातून २१ जून रोजी जगभरात साजऱ्या होणाऱ्या पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचा गाजावाजा सुरू असतानाच काही अल्पसंख्याक गटांच्या उफाळून आलेल्या विरोधापुढे केंद्राने साष्टांग नमस्कार घालत सूर्यनमस्कार वगळण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयावर उठलेल्या मतमतांतराने व त्यावरील भूमिका अणि वक्तव्यांनी वातावरण ढवळून निघाले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद असल्याची टीका सुरू झाली असतानाच योगासनांचा आणि धर्माचा संबंध काय, असा सवाल समर्थकांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांनी तर नमाज हा योगाचाच भाग असल्याचे वक्तव्य करून टाकले. अर्थात तूर्तास विरोधापुढे गुडघे टेकत सरकारने योगदिनाच्या कार्यक्रमातून सूर्यनमस्कार बाद केले आहेत.योगदिनाच्या कार्यक्रमाच्या स्वरूपावरून काहूर उठल्यानंतर योग आणि सूर्यनमस्काराची सक्ती नसल्याचा खुलासा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी लखनौ येथे केला. आंतरराष्ट्रीय योगदिनी योग करण्याची कोणतीही सक्ती नाही. मात्र योगदिनी अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही करीत आहोत. त्या दिवशी काय करायचे याबाबत पुस्तिका जारी केली जात आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. अखिल भारतीय मुस्लीम वैयक्तिक कायदे मंडळाने (मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड) शाळांमधून योग आणि सूर्यनमस्काराचा पायंडा पाडण्याविरुद्ध मोहीम उघडण्याचा निर्णय येतल्याबद्दल विचारण्यात आले असता राजनाथ म्हणाले की, मला या मंडळाच्या भूमिकेवर भाष्य करायचे नाही. कोणत्याही जात- पंथ किंवा धर्माशी त्याचा संबंध जोडू नये एवढेच मला सांगायचे आहे. योग हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगला आहे.———————————-मुस्लीम मंडळ सुप्रीम कोर्टात जाणार योगाविरुद्ध मोहीम छेडण्याचा निर्णय घेतानाच मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सोमवारी झालेल्या बैठकीत सरकारच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा ठराव पारित केला आहे. शाळांमधून योग आणि सूर्यनमस्कार अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध केला जाईल, असे या मंडळाने ठरावात स्पष्ट केले आहे. योगासने हा हिंदू जीवनपद्धतीचा भाग आहे. सूर्यनमस्कार ही सूर्याची प्रार्थना असल्यामुळे केवळ अल्लाची प्रार्थना करणाऱ्या मुस्लीम समुदायाला ती मान्य नाही, असे मंडळाने स्पष्ट केले आहे. —————————आदित्यनाथ यांची बोचरी टीकावेळोवेळी वादग्रस्त विधाने करून राजकीय वादळ निर्माण करणारे भारतीय जनता पार्टीचे आक्रमक नेते योगी आदित्यनाथ यांनी आता सूर्यनमस्कारास विरोध करणाऱ्यांनी समुद्रात जाऊन बुडावे, असे वादग्रस्त विधान वाराणशीत एका धार्मिक कार्यक्रमात केले. गोरखपूरचे खासदार असलेले आदित्यनाथ म्हणाले की, सूर्य हे आम्हाला जीवन देणाऱ्या ऊर्जेचे स्रोत आहे. सूर्याचा धर्माशी संबंध आहे असे ज्यांना वाटते त्यांनी एकतर समुद्रात जाऊन बुडावे अन्यथा काळ्या कोठडीत वास्तव्य करावे. अशा लोकांनी सूर्याचा प्रकाश अथवा उष्णताही नाकारावी, असा सल्ला देण्यासही त्यांनी कमी केले नाही.—————तीव्र प्रतिक्रियाआदित्यनाथ यांच्या या विधानाचा राजकीय पक्षांनी लगेच खरपूस समाचार घेतला. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीने त्यांना लक्ष्य करताना भाजपा नेते धार्मिक तेढ निर्माण करू इच्छितात, असा आरोप केला. जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याची खिल्ली उडविताना अनेकांना आता आपला बाडबिस्तरा गुंडाळावा, असे म्हटले. तर आदित्यनाथ यांना विष ओकण्याची सवय आहे, असे काँग्रेस नेत्या रिता बहुगुणा म्हणाल्या.———————-धर्माशी काय संबंध ?सूर्यनमस्काराचा धर्माशी काहीही संबंध नसताना सूर्यनमस्काराला विरोध का? असा सवाल योगगुरू रामदेव बाबा यांनी केला आहे. सूर्यनमस्काराला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार येथे वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया देताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली. आवश्यकता नसताना काही लोक सूर्यनमस्कार घालताना मंत्रोच्चार करीत असल्याने तो वादग्रस्त ठरत आहे. श्वास घेण्याचा आणि धर्माचा संबंध कसा जोडता येणार? पूर्व दिशेला बघूनच सूर्यनमस्कार घातला पाहिजे असेही नाही. मनुष्याला सुदृढ ठेवण्यासाठी योगा केला जातो. कोणत्याही धर्माशी न जोडताच त्याकडे बघितले जावे, असेही त्यांनी नमूद केले.————-नमाज हाही योगाच - एकनाथ खडसे

> तुम्ही अल्लाला नमस्कार करा अथवा सूर्याला, पण आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या दिवशी योग केलाच पाहिजे. कारण नमाज हेही योगाचे रूप आहे, असे वक्तव्य अल्पसंख्याक विकासमंत्री एकनाथ खडसे यांनी मुंबईत पत्रकारांजवळ केले.>  योग दिनाला एमआयएमकडून विरोध होत असल्याकडे खडसे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, जे राजकीय पक्ष प्रत्येक गोष्ट धार्मिक भावनेशी जोडून आपली राजकीय पोळी भाजतात त्यांना सूर्यनमस्कारात धार्मिक राजकारण दिसणारच. >  अशा मंडळींना आपले एवढेच सांगणे आहे की, तुम्ही अल्लास नमस्कार करा नाहीतर सूर्याला करा, उभ्याने नमस्कार करा नाहीतर आडव्याने नमस्कार करा, झोपेत नमस्कार करा नाहीतर जागेपणी करा; पण अांतरराष्ट्रीय योग दिनी योगा केलाच पाहिजे!

---------------भाजपाचे काही नेते योगाच्या नावावर काही समुदायांमध्ये दहशत पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही विशिष्ट समुदायाच्या तत्त्वांत योगा बसत नसताना योगा राजवट लादली जात आहे, असा आरोप जावई रॉबर्ट वड्रा यांनी केला.---------------२१ जूनच्या कार्यक्रमासाठी सरकारने १५ आसनांचे प्रात्यक्षिक असलेला व्हिडीओ शाळा आणि शैक्षणिक संस्थांना पाठविला आहे. विद्यार्थ्यांना सहजसोप्या वाटणाऱ्या आसनांचा समावेश त्यात आहे. अवघड असल्यामुळे सूर्यनमस्काराचा त्यात समावेश नाही. - श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुष मंत्री