केंद्राचे पथक घेणार पोषण आहाराचा आढावा
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
जिल्हा परिषद : २ ते १० फेब्रुवारी दरम्यान तपासणी नागपूर : शालेय विद्यार्थ्यांची उपासमार थांबावी, शाळेतील उपस्थिती वाढावी या हेतूने शासनामार्फत विद्यार्थ्याना पोषण आहार पुरविला जातो. या योजनेचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे पथक २ ते १० फेबु्रवारी दरम्यान नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. ...
केंद्राचे पथक घेणार पोषण आहाराचा आढावा
जिल्हा परिषद : २ ते १० फेब्रुवारी दरम्यान तपासणी नागपूर : शालेय विद्यार्थ्यांची उपासमार थांबावी, शाळेतील उपस्थिती वाढावी या हेतूने शासनामार्फत विद्यार्थ्याना पोषण आहार पुरविला जातो. या योजनेचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे पथक २ ते १० फेबु्रवारी दरम्यान नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. जिल्ह्यातील इयत्ता १ ली ते ५वी पर्यंतच्या २,६७० शाळांतील २ लाख ४६ हजार १४६ तर इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंच्या १,३७५ शाळांतील १ लाख ८९ हजार ९९ विद्यार्थ्यांना या योजनेला लाभ दिला जातो. केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून ही योजना राबविली जाते. यात केंद्र शासनाचा ७५ तर राज्य शासनाचा २५ टक्के वाटा आहे.पोषण आहारातून विद्यार्थ्यांना आवश्यक उष्मांक व प्रोटिन्स मिळणे अपेक्षित आहे. यासाठी आठवड्याचे मेनूकार्ड निश्चित करण्यात आलेले आहे. आठवड्यातून एक दिवस पूरक पोषण आहार द्यावयाचा आहे. यात फळे, बिस्किट यांचा समावेश असतो. यासाठी शाळा स्तरावर समिती गठित करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील ३०० महिला बचतगटांच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. ही योजना प्रभावीपणे राबविली जावी. यात लोकसहभाग असावा असे सरकारला अभिप्रेत आहे. यासाठी गेल्या २ वर्षातील रेकॉर्ड तपासण्यात येणार आहे. त्रुटी आढळल्यास संबंधितावर कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)चौकट .... पथक पुढील बाबी तपासणारपटसंख्येनुसार आहार शिजवला जातो की नाही.तांदूळ शिल्लक राहतो का, असल्यास का राहतो.रेकॉर्डनुसार उपलब्ध तांदूळ आहे की नाही.धान्य ठेवण्याची जागा सुरक्षित आहे की नाही.किचनशेडची सुविधा, मेनूतील विविधता खर्चाचा हिशेब योग्य आहे की नाही. पोषण आहार समितीच्या बैठका होतात की नाही.चौकट..........योजनेतील त्रुटी.......-सरकारकडून निधी मिळण्याला विलंब-अपुरा निधी व निकृष्ट धान्याचा पुरवठा-किचनशेडचा अभाव-लोकसभहभागाचा अभावचौकट...........जिल्हा अधीक्षकांचा दुजोरा पोषण आहार योजनेचा आढावा घेण्यासाठी २ ते १० फेब्रुवारी दरम्यान केंद्र सरकारचे १० ते १२ जणांचे पथक येत असल्याला शालेय पोषण आहार योजनेचे जिल्हा अधीक्षक नीलेश वाघमारे यांनी दुजोरा दिला आहे..........................