महसूल कर्मचाऱ्यांच्या कामात सूसूत्रता आणणार
By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST
नागपूर: महसूल कर्मचाऱ्याकडे असलेली कामे आणि मोठ्या प्रमाणात रिक्त असणारी पदे याचा विचार करून जिल्हा आणि तालुका कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करण्यात येत आहे. यामुळे पुढच्या काळात कामात सुसूत्रता येऊन कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्याची शक्यता आहे.
महसूल कर्मचाऱ्यांच्या कामात सूसूत्रता आणणार
नागपूर: महसूल कर्मचाऱ्याकडे असलेली कामे आणि मोठ्या प्रमाणात रिक्त असणारी पदे याचा विचार करून जिल्हा आणि तालुका कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करण्यात येत आहे. यामुळे पुढच्या काळात कामात सुसूत्रता येऊन कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्याची शक्यता आहे.महसूल विभागाकडे सध्या सोपविण्यात आलेली कामे आणि उपलब्ध मनुष्यबळ याचे प्रमाण व्यस्त आहे. ही बाब लक्षात आल्यावर शासनाने जिल्हा, उपविभाग आणि तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधात सुधारणा करण्यासाठी अभ्यासगट नियुक्त केला आहे. नवीन पदांची निर्मिर्ती आणि मनुष्यबळाचे फेरवाटप हा यामागचा मुख्य उद्देश आहे. नवीन भूसंपादन कायद्याची अंमलबजावणी, विभागनिहाय कामाची व्याप्ती, बिगर महसुली कामांसाठी नवीन पद रचना, कामाची कालमर्यादा निश्चित करून त्यानुसार कर्मचाऱ्यांची निश्चिती करणे आदीबाबत हा गट अभ्यास करणार आहे. (प्रतिनिधी)