शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करा

By admin | Updated: August 1, 2015 00:01 IST

जिल्हाधिकारी: मार्च २०१६ अखेर प्रत्येक गावात ई-फेरफार

जिल्हाधिकारी: मार्च २०१६ अखेर प्रत्येक गावात ई-फेरफार
सोलापूर: महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होण्यासाठी कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी महाराजस्व अभियान अधिक परिणामकारक राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी केले़ मार्च २०१६ अखेर ई-फेरफार सुविधा प्रत्येक गावात उपलब्ध करून देणे, गाव दप्तर अद्ययावत करणे, अतिक्रमणे काढणे आदींबाबत जिल्हाधिकार्‍यांनी माहिती दिली़
जिल्हाधिकारी कार्यालयात महाराजस्व अभियान राबविण्याबाबत बैठक आयोजित केली हेाती़ त्यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख आदी उपस्थित होते़ जिल्हाधिकारी मुंढे म्हणाले की, २९ जुलै २०१५ च्या शासन निर्णयानुसार महाराजस्व अभियान हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ या अभियानातील सर्व बाबींची पूर्तता करावी, ई-जिल्हाबाबत सर्व स्तरावर अंमलबजावणी करावी, लोकांपर्यंत प्रशासन पोहोचेल या दृष्टीने सर्वांनी कार्यवाही करण्याचे आवाहन केले़ या अभियानांतर्गत विविध दाखले शिबिरे घेऊन द्यावयाची आहेत़ आधार कार्ड काढून देण्याच्या तसेच विस्तारित समाधान योजनेंतर्गत सर्व सेवा दिल्या पाहिजेत़ ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत सर्व प्रकारची प्रमाणपत्रे शिबिरे घेऊन दिली जावीत, अशा सूचना यावेळी दिल्या़
या अभियानांतर्गत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढणे, निष्कासन मोहीम परिणामकारक कालबध्द कार्यक्रम राबवून ६ महिन्यांत कार्यवाही पूर्ण करणे, विविध प्रकारच्या जमिनींची डेटाबँक तयार करणे, शासकीय जमिनीवरील भाडेप˜्यांचे नूतनीकरण आदींबाबत विशेष मोहिमा राबविण्याबाबत चर्चा झाली़