शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॅलेंटाइन डे’पूर्वी रेव्ह पार्टीची तयारी!

By admin | Updated: February 11, 2017 01:07 IST

निवडणुकीच्या काळात भलेही पंजाबमधील अंमली पदार्थांच्या व्यसनाचा मुद्दा ऐरणीवर आला असेल. पण, राजधानी दिल्लीत सध्या तरुणांच्या रेव्ह पार्टीची चर्चा जोरात आहे.

नितीन अग्रवाल , नवी दिल्लीनिवडणुकीच्या काळात भलेही पंजाबमधील अंमली पदार्थांच्या व्यसनाचा मुद्दा ऐरणीवर आला असेल. पण, राजधानी दिल्लीत सध्या तरुणांच्या रेव्ह पार्टीची चर्चा जोरात आहे. ही रेव्ह पार्टीपेक्षा कमी नसेल आणि तरुणांना खुलेआम अंमली पदार्थ दिले जातील, अशी चर्चा दिल्लीत सुरू आहे. या पार्टीला देण्यात आलेल्या नावातच लैंगिकतेचा अर्थ आहे. त्यामुळे त्यावर पोलिसांची करडी नजर असेल.दरवर्षी व्हॅलंटाइन डेच्या निमित्ताने ठिकठिकाणी अशा पार्ट्या लपूनछपून होत असतात. मात्र त्या दिवशी त्या होत नाहीत. या पार्ट्या १४ फेब्रुवारीच्या आधी वा नंतर होतात. यंदाही रविवारी म्हणजे १२ फेब्रुवारी रोजी ती होणार असल्याचे उघड झाले आहे. अशा पार्ट्यांवर पोलिसांचे नेहमीच लक्ष असते आणि दिल्ली तसेच मुंबईच्या आसपास होणाऱ्या अनेक असल्या पार्ट्या पोलिसांनी यापूर्वी उधळून लावल्या आहेत. पार्टीशी संबंधित आयोजकांनी दावा केला आहे की, ही दिल्लीतील तरुण-तरुणींची ही पहिली रेव्ह पार्टी असेल. आॅनलाइन पोर्न पुरविण्यासाठी बदनाम असलेल्या काही पोर्न साइट्समार्फत कमी वयातील तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात काही पोर्न स्टार सहभागी होणार असल्याचा दावाही आयोजक करत आहेत. मात्र ती शक्यता कमी आहे. दक्षिण दिल्लीच्या हौज खास भागात रविवारी दुपारी एक वाजल्यापासून या पार्टीची सुरुवात होणार आहे. या पार्टीत अश्लिलता मोठ्या प्रमाणावर असेल, असे संकेत आयोजकांनी दिले आहे. व्हॅलेंटाईन डेच्या आडून नेहमीच अशा पार्ट्या गुपचुप आयोजित केल्या जातात. पण, ही पहिलीच वेळ आहे की, खुले आम याचे आयोजन केले जात आहे. फेसबूक आणि अन्य सोशल साइट्सच्या माध्यमातून याची तिकीटे उघडपणे विकली जात आहेत. प्रवेश तिकीट १३०० रुपयांपासून ते ३००० रुपयांपर्यंत विकण्यात येत आहे. या बदल्यात प्रवेशासोबत विदेशी मद्य दिले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही लोकांनी तर फेसबूकवरुनच सहभागी होत असल्याचे सांगून टाकले आहे. अर्थात, या पार्टीच्या आयोजनाबाबत फेसबुकवरून अनेकांनी यावर सवाल केला आहे. अशा प्रकारे आयोजन कसे होऊ शकते? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.