शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भेटवस्तू वापसीने राजकारण तापले

By admin | Updated: March 23, 2016 03:34 IST

बिहार विधिमंडळात सरकारी विभागांकडून वाटण्यात येत असलेल्या भेटवस्तूंचे जोरदार राजकारण सुरू आहे. सोमवारी सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी पोहोचलेले भाजपचे

एस.पी. सिन्हा,  पाटणाबिहार विधिमंडळात सरकारी विभागांकडून वाटण्यात येत असलेल्या भेटवस्तूंचे जोरदार राजकारण सुरू आहे. सोमवारी सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी पोहोचलेले भाजपचे प्रदेश अध्यक्ष मंगल पांडे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते सुशीलकुमार मोदी यांनी शिक्षण विभागासह अन्य विभागांकडून मिळालेल्या भेटवस्तू परत केल्या. त्यानंतर माजी मुख्यमंत्री राबडीदेवी प्रचंड भडकल्या. सुशीलकुमार मोदी यांनी ते सरकारमध्ये असताना त्यांना मिळालेल्या भेटवस्तूसुद्धा परत करायला पाहिजे होत्या, असे टीकास्त्र सोडत त्यांनी लक्ष्य साधले. मोदी यांना जनतेची एवढीच चिंता होती तर त्यांनी या सर्व भेटी लोकांना वाटून दिल्या असत्या. परत करण्याची काय गरज होती, असा त्यांचा सवाल होता. जर भेटवस्तू परत करायच्या होत्या तर सुशीलकुमार मोदी यांनी त्या स्वीकारायलाच नको होत्या, असे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे म्हणणे होते. या मुद्यावर राजकारण होऊ नये, असे सांगून ते म्हणाले की, मोदी सरकारमध्ये असताना त्यांचे मंत्रीसुद्धा भेटवस्तू देत असत. मुळात माध्यमांनी यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतरच ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रेमकुमार आणि प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी शनिवारी संयुक्तपणे विभागांकडून मिळालेल्या भेटवस्तू परत करण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दररोज विविध विभागांकडून आमदारांना भेटी देण्यात आल्या. शिक्षण विभागाने मायक्रोव्हेव दिले तर अन्य विभागांनी सुटकेस, मोबाईलसह अन्य काही वस्तू दिल्या.