शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST

आ. जाधवांवर कारवाई करा : बापूंच्या पुतळ्याजवळ निदर्शने

आ. जाधवांवर कारवाई करा : बापूंच्या पुतळ्याजवळ निदर्शने
नागपूर : पोलीस निरीक्षकास मारहाण करणारे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी आज जोरदार निदर्शने केली.
आ. जाधव यांनी पोलीस निरीक्षक पराग जाधव यांना बुधवारी सायंकाळी कानशिलात लगावली होती. या प्रकरणी सोनेगाव पोलिसांनी आ. जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तथापि, अटकपूर्व जामीन मिळाल्यामुळे आ. जाधव यांना पोलीस अटक करू शकले नाहीत. दरम्यान, घटनेमुळे आजी-माजी पोलीस अधिकाऱ्यांत तीव्र रोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कल्याणकारी असोसिएशन, नागपूरच्या वतीने निषेध धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आज सकाळी १० वाजता सीताबर्डीतील व्हेरायटी चौकात असोसिएशनचे पदाधिकारी एकत्र झाले. त्यांनी म. गांधी यांच्या पुतळयाजवळ काळ्या फिती लावून आ. जाधव यांचा निषेध केला. त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. आ. जाधव यांचा अटकपूर्व जामीन रद्द व्हावा, त्यांच्यावरील सर्व पोलीस ठाण्यातील गुन्हे एकत्र करून कोर्टात या प्रकरणांचा तातडीने निकाल लावण्यासाठी प्रयत्न करावे तसेच यानंतर अशा घटना घडू नये म्हणून खास उपाययोजना कराव्या, अशी मागणी आंदोलकांनी केली. दुपारी १.३० पर्यंत हे निषेध आंदोलन सुरू होते. असोसिएशनचे अध्यक्ष एम. ए. अजिज, सचिव निवृत्त उपअधीक्षक रमेश मेहता, एस. एच. महाजन, सुरेश महाले, नागेश घोडकी, चंद्रकांत हटवार, दिलीप तिडके यांच्यासह अनेक निवृत्त पोलीस अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. ज्येष्ठ समाजसेवक उमेशबाबू चौबे यांनीदेखील आंदोलनात सहभागी होऊन निषेध नोंदवला.
----