शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आठ मिनिटांत निकाल; दहा वर्षे बंदी

By admin | Updated: February 15, 2017 00:22 IST

अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही.के. शशिकला यांना बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्यात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम राखत दोषी ठरवले.

नवी दिल्ली/चेन्नई : अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही.के. शशिकला यांना बेहिशेबी मालमत्तेच्या खटल्यात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम राखत दोषी ठरवले. त्यांना चार वर्षांच्या तुरुंगवासाची व दहा कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा भोगावी लागणार आहे. त्यापैकी सहा महिन्यांची शिक्षा त्यांनी आधीच भोगल्यामुळे त्यांना साडेतीन वर्षे तुरुंगात घालवावी लागतील. या निर्णयामुळे शशीकला यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. शशिकला यांना दहा वर्षे निवडणूक लढवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. बेहिशेबी मालमत्तेचा हा खटला १९ वर्षांपूर्वीचा आहे. त्यात जयललिताही आरोपी होत्या. या खटल्यात बंगळुरू येथील न्यायालयाने दिलेला निवाडा आणि काढलेले निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवले. शशिकला यांचे दोन नातेवाईक व्ही. एन. सुधाकरन आणि एलारावसी हेही यात दोषी ठरले आहेत. न्या. पी. सी. घोष आणि न्या. अमिताव रॉय यांच्या खंडपीठाने बंगळुरू येथील न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्या तुरुंगातून सुटल्यानंतरही लोकप्रतिनिधी कायद्यान्वये सहा वर्षे निवडणूक लढवू शकणार नाहीत आणि परिणामी मुख्यमंत्रीही बनू शकणार नाहीत.खालच्या न्यायालयाने शशीकला आणि त्यांच्या दोन नातेवाईकांना प्रत्येकी चार वर्षांचा तुरुंगवास आणि दहा-दहा कोटी रुपये दंड ठोठावला होता. जयललिता यांना चार वर्षांचा तुरुंगवास आणि १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.आठ मिनिटांत निर्णयखंडपीठाने हा महत्वाचा निर्णय केवळ आठ मिनिटांत घोषित केला. न्या. घोष व न्या. रॉय १०.३२ मिनिटांनी आले. न्यायालयात यावेळी वकील आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी होती. दोघा न्यायाधीशांनी चर्चा केल्यानंतर न्या. घोष यांनी निर्णयाचा महत्त्वाचा भाग वाचून पूर्ण केला, तेव्हा १०.४० मिनिटे झाली होती. न्या. रॉय म्हणाले की, समाजातील भ्रष्टाचाराच्या वाढत्या संकटाबद्दल आम्हाला तीव्र चिंता वाटत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क/वृत्तसंस्था)