जोधपूर : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान याच्या विरोधातील खटल्याचा निकाल जोधपूर न्यायालय १८ जानेवारी रोजी देणार आहे. येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सोमवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपल्यावर, १८ जानेवारी हा निकालाचा दिवस निश्चित केला. महानगर न्यायदंडाधिकारी दलपत सिंह राजपूत यांनी निकालाच्या दिवशी सलमान खानला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची अंतिम सुनावणी ९ डिसेंबर रोजी सुरू झाली होती. परवाना संपलेले शस्त्र बाळगणे आणि वापरणे याबद्दल राजस्थानच्या वन खात्याने जोधपूर पोलिसांकडे आॅक्टोबर १९९८ मध्ये सलमान खानविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. या खटल्यास सलमान खान दोषी ठरल्यास त्याला सात वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. (वृत्तसंस्था)
सलमानचा निकाल १८ जानेवारीला
By admin | Updated: January 10, 2017 01:19 IST