शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’चा निकाल २६ जूनपर्यंत

By admin | Updated: June 13, 2017 01:45 IST

देशभरातील सरकारी व खासगी महाविद्यालयांमधील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या यंदाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : देशभरातील सरकारी व खासगी महाविद्यालयांमधील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या यंदाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ (नीट) चा निकाल येत्या २६ जूनपर्यंत जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) त्यादृष्टीन सोमवारीे लगेच तयारी सुरु केली.याचाच एक भाग म्हणून ‘ओएमआर’ (आॅप्टिकल मार्क रेकग्निशन रिस्पॉन्स) शीट््स आणि ‘आन्सर कीज’ प्रसिद्ध करण्याच्या व त्यांना आव्हान देण्याच्या तारखा मंडळाने जाहीर केल्या.मंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार ‘ओएमआर शीट््स’ आणि उमेदवारांनी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांना दिलेली उत्तरे यांच्या प्रतिमा मंगळवार दि. १३ जून रोजी प्रर्शित केल्या जातील. त्यांना उमेदवार १४ जूनच्या सा. ५ पर्यंत आव्हानदेऊ शकतील. आधी या आव्हानासाठी ठरविलेली तीन दिवसांची मुदत कमी करून दोन दिवस करण्यात आली आहे. याचप्रमाणे ‘आन्सर कीज’ १५ जून रोजी प्रदर्शित केल्या जातील व त्यांना १६ जूनच्या सा. ५ वाजेपर्यंत आव्हान देता येईल.‘नीट’च्या वेबसाइटवर उमेदवारांना ‘ओएमआर शीट््स’ व ‘आन्सर कीज’ पाहता येतील. तसेच याच वेबसाइटवर आपल्या परीक्षा क्रमांक आणि पासवर्डने लॉग-इन करून उमेदवार या दोन्हींना आॅनलाइन आव्हान दाखल करू शकतील. प्रत्येक प्रश्नाच्या आव्हानासाठी एक हजार रुपये शुल्क भरावे लागेल. ठरलेल्या वेळेत आणि फक्त आॅनलाइन दाखल केलेले आव्हानच विचारात घेतले जाईल.इंग्रजी व हिंदी याखेरीज अन्य भाषांमधील प्रश्नपत्रिकांमधील प्रन निरनिराळे होते या मुद्यावर मद्रास उच्च न्यायालयाने ‘नीट’ परीक्षेचे निकाल जाहीर करण्यास अंतरिम स्थगिती दिल्याने आठ जून रोजी अपेक्षित असलेले निकाल जाहीर होऊ शकले नव्हते. मात्र ‘सीबीएसई’ने याविरुद्ध केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती उठविली व २६ जूनपर्यंत निकाल जाहीर करण्याचा आदेश दिला.एमबीबीएस अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणारे १७ लाख विद्यार्थी निकालाची वाट पाहात आहेत.