शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

केरळात कर्मचाऱ्यांच्या अभिव्यक्तीला लगाम

By admin | Updated: November 24, 2015 00:03 IST

केरळात काँग्रेस सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक, सर्जनशील, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधील सहभागावर अंकुश आणणारा आदेश जारी केला आहे

तिरुवनंतपुरम : केरळात काँग्रेस सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक, सर्जनशील, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमधील सहभागावर अंकुश आणणारा आदेश जारी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या टीव्ही टॉक शो किंवा बातम्यांवर आधारित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. साहित्यिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यामागे लाभाचा उद्देश नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर त्यांच्या अर्जांची गुणवत्ता तपासून परवानगी दिली जाईल. या निर्बंधाची व्याप्ती कर्मचाऱ्यांचे संशोधन आणि साहित्यविषयक कार्यासाठीही राहणार आहे.केरळ सरकारने शासकीय नोकरदारांसाठी कलम ४८ नुसार आधीच आचारसंहिता लागू केलेली आहे. त्यांना आधीपासूनच साहित्य, संस्कृती आणि अन्य कार्यक्रमांत सहभाग नोंदवायचा झाल्यास सशर्त परवानगी घेणे आवश्यक असताना कर्मचारी परवानगी घेत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे नवी मार्गदर्शक तत्त्वे आवश्यक असल्याचे अधिकृत सूत्रांनी म्हटले. अखेर वादग्रस्त आदेश स्थगितदरम्यान, चौफेर टीका होऊ लागताच केरळ सरकारने सोमवारी रात्री हा वादग्रस्त आदेश स्थगित केला आहे. संबंधित आदेश फार पूर्वीचा असून त्यामुळे वाद निर्माण होण्याची परिस्थिती जाणून घेण्याबाबत मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी मुख्य सचिव जीजी थॉमसन यांना अहवाल सादर करण्यास सांगितल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)