शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

परंपरांचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची : अमित शाह

By admin | Updated: August 12, 2016 00:56 IST

धावता दौरा : पाच मिनिटांत आटोपले भाषण

धावता दौरा : पाच मिनिटांत आटोपले भाषणत्र्यंबकेश्वर : अनादी काळापासून सुरू असलेल्या धर्माच्या प्राचीन परंपरांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी जशी सरकारची आहे तशीच ती सर्वांची आहे, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केले.कुशावर्तनजीक उभारलेल्या छोटेखानी सभामंडपात सिंहस्थाची सांगता ध्वजावतरणाने करण्यात आल्यानंतर छोटेखानी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सिंहस्थात चांगली कामगिरी करणार्‍या प्रशासनातील अधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अमित शाह बोलत होते. अमित शाह पुढे म्हणाले की, गुरू आणि सिंहाने कन्या राशीत प्रवेश केल्यानंतर हा सोहळा झाला. संतांचा आणि सिंहस्थाचा आशीर्वाद असल्याने यंदाच्या मोसमात दमदार पाऊस झाला. महाराष्ट्रातही दमदार पाऊस झाल्याने दुष्काळ दूर झाला आहे. सिंहस्थासारख्या प्राचीन परंपरेचे संवर्धन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. कुंभमेळा हा श्रद्धेचा महापूर आहे. आज त्र्यंबकराजाच्या पावन कुशीत सिंहस्थाची सांगता होत आहे. पुढील सिंहस्थ यापेक्षा चांगला होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय अन्न व उद्योग प्रक्रिया राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार महेश गिरी, अखिल भारतीय षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज, षडदर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत सागरानंद सरस्वती, महामंत्री महंत हरिगिरीजी महाराज, महंत बिंदू महाराज, नगराध्यक्ष विजया ल‹ा, डॉ. प्रशांत पाटील, ललित लोहगावकर, धनंजय तुंगार, संतोष कदम, जयंत शिखरे, अपर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, प्रांत बाळासाहेब वाघचौरे, त्र्यंबकेश्वर नगरपालिका मुख्य कार्यकारी अधिकारी चेतना केरूरे आदि उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)फोटो कॅप्शन- त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथे सिंहस्थ ध्वजावतरणाप्रसंगी गंगापूजन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरिगिरी महाराज, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन तसेच ब्रšावृंद.