शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी परिसंवाद पदाधिकार्‍यांच्या प्रतिक्रिया

By admin | Updated: December 13, 2015 00:07 IST

दत्तात्रय धनकवडे (महापौर) - स्मार्ट सिटी आराखडयाबाबत सर्वच पक्षांनी सकारात्मक भुमिका ठेवली पाहिजे. पुणेकरांना त्याबाबत काय वाटते या भावनांचा आदर केला पाहिजे. प्रत्येक नगरसेवकाने त्याचा अभ्यास केला पाहिजे. स्मार्ट सिटी आराखडयामध्ये आम्ही सुधारणा सुचविणार आहोत. स्मार्ट सिटीसाठी स्थापन होणार्‍या कंपनीने चांगले काम करणे अपेक्षित आहे, ते केवळ कर्ज काढून ठेवणार ...


दत्तात्रय धनकवडे (महापौर) - स्मार्ट सिटी आराखडयाबाबत सर्वच पक्षांनी सकारात्मक भुमिका ठेवली पाहिजे. पुणेकरांना त्याबाबत काय वाटते या भावनांचा आदर केला पाहिजे. प्रत्येक नगरसेवकाने त्याचा अभ्यास केला पाहिजे. स्मार्ट सिटी आराखडयामध्ये आम्ही सुधारणा सुचविणार आहोत. स्मार्ट सिटीसाठी स्थापन होणार्‍या कंपनीने चांगले काम करणे अपेक्षित आहे, ते केवळ कर्ज काढून ठेवणार असतील तर ते चालणार नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी नागरिकांवर अतिरिक्त कराचा बोजा टाकता कामा नयेत. स्मार्ट सिटीसाठी सर्वच पक्षांनी राजकीय जोडे बाजूला ठेऊन एकत्र आले पाहिजे.
.............

ॲड. अभय छाजेड (शहराध्यक्ष, काँग्रेस) - स्मार्ट हा शब्द चांगला आहे, याअंतर्गत शहर सुंदर होणार असल्याचे स्वप्न दाखविण्यात आले आहे. स्मार्ट सिटी आराखडयामध्ये सर्वात आक्षेपार्ह मुदद हा स्पेशल पर्पज व्हेईकलचा (एसपीव्ही) आहे. एसपीव्ही ही घटनेशी सुसंगत आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटीचे एसपीव्ही मॉडेल स्वीकारले तर महापालिकेच्या आणखी वेगवेगळया सुविधांसाठी एसपीव्ही उभारण्याचे प्रस्ताव पुढे येतील. पीएमपीएलची कंपनी स्थापन झाली त्याचा अनुभव काय आहे याचाही यानिमित्तने विचार करावा लागेल. पुण्यापेक्षा मोठी असलेल्या मुंबई महापालिकेमध्ये अधिकारांचे चांगल्या पध्दतीने विक्रेंद्रीकरण करण्यात आले आहे, तसे पुणे महापालिकेचेही सक्षमीकरण झाले पाहिजे.
.............

रूपाली पाटील (अध्यक्ष, शहर सुधारणा समिती) - स्मार्ट सिटी आराखडयासाठी डोळे झाकून मान्यता दिली असता लोकांनी त्याचा आम्हांला जाब विचारला असता. स्मार्ट सिटी आराखडयामधील एसपीव्ही ही केवळ नगरसेवकांचीच नाही तर घटनेच्या हक्काचीही पायमल्ली आहे. भाजपची महापालिकेमध्ये सत्ता येईल की नाही माहिती नाही मात्र एसपीव्हीच्या माध्यमातून शहरावर वरदहस्त ठेवण्यासाठी केंद्राकडून हा प्रस्ताव मांडला जात आहे. आयुक्त हे एका पक्षाचा अजेंडा मांडत आहेत, त्यांना प्रमोशनवर जायचे आहे म्हणून ते यासाठी झटत आहेत. स्मार्ट सिटी करण्यासाठी पुणे शहरच का हवे, इतर शहरांचा ते का विचार करीत नाहीत.
............