शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनमोहन सिंग यांच्याविषयी आदर, सरकारच्या खुलाशाने कोंडी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 05:18 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर संसदेत निर्माण झालेली कोंडी अखेर सरकारच्या खुलाशानंतर फुटली.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डॉ. मनमोहन सिंग यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर संसदेत निर्माण झालेली कोंडी अखेर सरकारच्या खुलाशानंतर फुटली. आम्हाला डॉ. सिंग यांच्याविषयी आदर असून, देशाप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीवर आम्हाला शंका नाही, असे निवेदन राज्यसभेचे सभागृहनेते अरुण जेटली यांनी केले. त्यानंतर, काँग्रेसनेही समजूतदारपणाची भूमिका घेतली. काही नेत्यांनी पंतप्रधानांविरोधात केलेले वक्तव्य ही काँग्रेसची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले.या वक्तव्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज काही दिवस स्थगित करावे लागले होते. मणिशंकर अय्यर यांच्या निवासस्थानी डॉ. मनमोहन सिंग हे पाकच्या वरिष्ठ अधिका-यासोबतच्या बैठकीला उपस्थित होते, अशी टीका मोदी यांनी केली होती. याबाबत काँग्रेसने म्हटले की, मोदी यांनी जे वक्तव्य केले, त्यावरून डॉ. सिंग व इतर नेते पाकिस्तानसोबत कट रचत असल्याचा समज निर्माण होतो. मोदी यांनी त्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे, अशीही काँग्रेसची मागणी होती.>गुलाम नबी आझाद यांनी मानले आभारजेटलींच्या निवेदनाला उत्तर देताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी जेटली यांनी केलेल्या निवेदनाबद्दल आभार मानले. या निवेदनानंतर आता संसदेतील कामकाज सुरळीत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या काही नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या विरोधातील कोणत्याही शेरेबाजीला आम्ही मान्यता देत नाही, असे स्पष्ट केले. मोदी यांच्याबद्दल ‘नीच’ शब्द वापरणा-या अय्यर यांना पक्षातून निलंबित केले आहे.बुधवारी निवेदन करताना जेटली म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग व माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या देशाबद्दलच्या बांधिलकीवर कधीही प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला नाही. तसे त्यांना म्हणायचेही नव्हते. मात्र, तशा प्रकारचा समज निर्माण होणे पूर्णपणे चुकीचा आहे. या नेत्यांबद्दल आम्हाला मोठा आदरच आहे. गुजरातेत प्रचारादरम्यान दोन्ही बाजूंनी अनेक वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली होती. मात्र, अशा मुद्द्यांवरून संसदेचे काम बंद राहावे, असे सरकारला वाटत नसल्याचे जेटली यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी कामकाज केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी घटनेत बदल करण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आल्यामुळे सकाळी कामकाज तहकूब झाले होते.

टॅग्स :Arun Jaitleyअरूण जेटली