शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
4
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
5
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
6
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
7
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
8
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
9
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
10
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
11
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
12
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
13
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
14
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
15
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
16
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
17
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
18
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
19
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
20
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 

ठेंगोड्याची गायरान जमीन देण्यास ग्रामस्थांचा विरोध

By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST

सीईओंना निवेदन, खासदारांनी दिशाभूल केल्याचा आरोप

सीईओंना निवेदन, खासदारांनी दिशाभूल केल्याचा आरोप
नाशिक : बागलाण तालुक्यातील ठेंगोडा येथील गायरान जमीन सटाणा नगरपालिकेसाठी साठवण बंधारा बांधण्यासाठी देण्यास ठेंगोडा ग्रामसभेने आणि ग्रामस्थांनीही विरोध केला असून ही गायरान जमीन साठवण बंधार्‍यासाठी देऊ नये अन्यथा ठेंगोडा ग्रामस्थ आंदोलन करतील,असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भाजपा खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची दिशाभूल करून त्यांना ठेंगोडा ग्रामपंचायतीअंतर्गत असलेली गट नं-६६३ व ६७२ ही जमीन सटाणा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी साठवण बंधारा बांधण्यास देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे पाठविला आहे. वास्तविक ठेंगोडा ग्रामपंचायतीने या प्रस्तावाला विरोध केला आहे. प्रस्तावित ६६३ व ६७२ गटनंबरच्या गायरान जमिनीलगतच सामाजिक वनीकरणाची जमीन असून तेथे २० ते २५ वर्षे जुने वृक्ष आहेत. या जागेऐवजी अस्तित्वात असलेला जुना पाझर तलाव ज्याची लांबी ६२० मीटर असून धरणाची उंची ११ मीटर आहे. तसेच सांडव्याची लांबी ७५ मीटर आहे. या पाझर तलावाची साठवण क्षमता मोठी असून या पाझर तलावाचे साठवण बंधार्‍यात रूपांतर झाल्यास शासनाच्या मोेठ्या प्रमाणात निधीची बचत होणार आहे. यालगतच सुळे डावा कालवा आलेला आहे. त्यामुळे बंधार्‍याला पाणी राहील. तसेच या जागेवर इंदिरा आवास योजनेसाठी जागा देण्याचा ग्रामसभेचा ठराव करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला आहे. गावाकडे विकासासाठी कोणतीही जमीन शिल्लक राहिलेली नाही. तरी सदर जमीन साठवण बंधार्‍यास देऊ नये, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर भास्कर साखरे, गोवर्धन तांदळे, राजेंद्र पवार, मधुकर व्यवहारे, दादाजी अहिरे, चंद्रकांत कोेठावदे, जिभाऊ पवार, संजय बत्तासे, लक्ष्मण पगार, मोतीराम चौधरी, विजयकुमार जोशी, नंदकिशोर चौधरी यांच्यासह ग्रामस्थांची नावे आहेत. जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)