शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक दुर्बलांना आरक्षण द्या!

By admin | Updated: September 5, 2016 05:56 IST

राखीव जागांची कमाल मर्यादा ५० टक्क्यांवरून ७५ टक्के करून सवर्णांतील आर्थिक दुर्बलांना आरक्षण देण्याची सूचना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली

नवी दिल्ली : राखीव जागांची कमाल मर्यादा ५० टक्क्यांवरून ७५ टक्के करून सवर्णांतील आर्थिक दुर्बलांना आरक्षण देण्याची सूचना सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली असून, या सूचनेस राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने अनुकूलता दर्शविली आहे. शिक्षण आणि नोकऱ्यांत सवर्णांमधील आर्थिक दुर्बलांना आरक्षण हवे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे सदस्य एस. के. खार्वेंथन आणि ए.के. सैनी यांनी सांगितले की, अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांचे सध्याचे ४९.५० टक्के आरक्षण कायम ठेवून, ही मर्यादा ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्याच्या सूचनेचे आम्ही स्वागत करतो, तर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष पी.एल. पुनिया म्हणाले की, आरक्षणाच्या विस्ताराबाबत आम्हीही सकारात्मक आहोत. कारण अनुसूचित जाती आणि जमाती यांचे आरक्षण हे संरक्षित आहे आणि समाजातील एखाद्या वर्गाला जर आरक्षण दिले जात असेल, तर त्यावर आमचा आक्षेप नाही. तथापि, सध्याचे आरक्षण हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि अनुसूचित जाती, जमातीच्या वर्गासाठी आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती व्ही. ईश्वरय्या यांनी दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत असा सल्ला दिला होता की, जो वर्ग आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या मागास आहे, अशांना आरक्षण देण्याचा विचार व्हावा. (लोकमत न्यूज नेटवर्क)>आरक्षण कुणाला? आठवले म्हणाले की, क्रीमिलेअरच्या आधारे सवर्णांतील अशा वर्गाला २५ टक्के आरक्षण द्यायला हवे, ज्यांचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांच्या आत आहे.