शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

संसदीय समितीपुढे होणार रिझर्व्ह बँकेची ‘झडती’

By admin | Updated: January 9, 2017 05:21 IST

नोटाबंदीनंतर लगेचच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर एक शब्दही न बोलल्याने आणि लोकसभेत साधक-बाधक चर्चाही होऊ

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर लगेचच झालेल्या संसदेच्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर एक शब्दही न बोलल्याने आणि लोकसभेत साधक-बाधक चर्चाही होऊ न शकल्याने, संसदेच्या लोकलेखा समितीने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल व वित्त विभागातील तीन सचिवांना पाचारण करून, त्यांची झाडाझडती घेण्याचे ठरविले आहे. यातून जी माहिती मिळेल, त्या आधारे अहवाल सादर करून त्या अनुषंगाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी सरकारला धारेवर धरता येईल, असा यामागे विचार असावा, असे दिसते.लोकलेखा समिती ही अत्यंत महत्त्वाची संसदीय समिती असून, ज्येष्ठ काँग्रेस नेते के. व्ही. थॉमस तिचे अध्यक्ष आहेत. समितीने नोटाबंदीचा विषय स्वत:हून हाती घेण्याचे ठरवून त्या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. पटेल व आर्थिक बाबींचे सचिव शक्तिकांत दास, महसूल सचिव हसमुख अढिया व वित्तीय सेवा सचिव अंजुली चिब दुग्गल या वित्त मंत्रलयातील तीन वरिष्ठ सचिवांना येत्या २८ जानेवारी रोजी पाचारण केले आहे. नोटाबंदीच्या संपूर्ण ५० दिवसांच्या काळात स्वत: गव्हर्नर पटेल जाहीरपणे काही बोलले नव्हते, पण दास व अढिया हे दोघे सरकारचा चेहरा म्हणून रोज माध्यमांसमोर बोलत होते.या तिन्ही सचिवांनी १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प असल्याने त्याच्या अगदी तोंडावर न बोलावता नंतर केव्हा तरी बोलवावे, अशी विनंती केली होती. परंतु समितीने ती अमान्य करून तुम्ही २८ जानेवारी रोजीच या. तिघांनी एकदम न येता एक एक करून या. प्रत्येकाला तासाभरात मोकळे करू, असे त्यांना कळविल्याचे कळते.याखेरीज आणखीही तीन संसदीय समित्यांनी नोटाबंदीचा विषय हाती घेतला असून या चारपैकी तीन समित्यांचे अध्यक्षपद काँग्रेसकडे आहे. एम. वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालील वित्त मंत्रालयाशी संबंधित स्थायी समितीने डॉ. पटेल व सरकारी बँकांच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांना बोलावले आहे. दुय्यम विधींसंबंधी राज्यसभा समितीसमोर डॉ. पटेल यांची साक्ष काही दिवसांपूर्वीच झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)समितीचे काही प्रश्नच्लोकांनी त्यांच्याच बँक खात्यांमधून पैसे काढण्यावर निर्बंंध घातले त्याला कायदेशीर आधार काय? रिझर्व्ह बँकेच्या या कृतीला कोणत्याही कायद्याचा आधार तुम्ही दाखवू शकला नाहीत तर अधिकारांचा गैरवापर केल्याबद्दल पदावरून दूर करून तुमच्यावर खटला का भरला जाऊ नये? नवे चलन यायला किती अवधी लागेल, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने सरकारला दिला होता?उत्तरे दिल्यास पंचाईतसमितीने गव्हर्नर डॉ. पटेल यांना नोटाबंदीशी संबंधित १० प्रश्न पाठविले असून, त्यांची उत्तरे २८ तारखेला द्यावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रश्नांचा रोख पाहिल्यास उत्तरे देताना रिझर्व्ह बँकेची मोठी अडचण होईल व त्यांची खरी उत्तरे दिली, तर सरकारची पंचाईत होईल, असे दिसते.