नवी दिल्ली : पाच हजार रुपयांची चलनी नोट व्यवहारात आणण्याचा रिझव्र्ह बँकेचा कोणताही विचार नाही. या संदर्भातील बातम्या व चर्चा केवळ अफवा आहेत, असा खुलासा बँकेच्या प्रवक्त्याने सोमवारी केला.
अशी नोट मंगळवारी व्यवहारात आणली जाणार असल्याची चर्चा टि¦टरवर जोरात सुरू होती. बँकेची अशी कोणतीही योजना नाही. नोटेबद्दलची अफवा कुठून सुरू झाली हे आम्हाला माहीत नाही, असे हा प्रवक्ता म्हणाला. 5,क्क्क् रुपयांची नोट फार पूर्वी चलनात होती. 195क् मध्ये 1,क्क्क्, 5,क्क्क् आणि 1क्,क्क्क् रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या होत्या परंतु त्या चलनातून काढून घेण्यात आल्या, असे रिझव्र्ह बँकेच्या वेबसाईटवरून समजते. (लोकमत न्यूज नेटवर्क)