शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅसिडहल्लाग्रस्तांना दिव्यांग कोट्यातून आरक्षण

By admin | Updated: June 22, 2017 01:56 IST

केंद्र सरकारी नोकऱ्यांमध्ये थेट नियुक्तीने भरायची पदे व बढत्या यामध्ये दिव्यांगांसाठी असलेल्या आरक्षणामध्ये आॅटिझम, मानसिक आजार व गतिमंद

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : केंद्र सरकारी नोकऱ्यांमध्ये थेट नियुक्तीने भरायची पदे व बढत्या यामध्ये दिव्यांगांसाठी असलेल्या आरक्षणामध्ये आॅटिझम, मानसिक आजार व गतिमंद असलेल्या व्यक्तींसोबतच अ‍ॅसिडहल्ल्याने विद्रूपता आलेल्या व्यक्तींचा समावेश करण्याचा प्रस्ताव कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने केला आहे.हे आरक्षण सर्व प्रवर्गांत म्हणजेच लिपिक पदापासून ‘आयएएस’ अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ पदांपर्यंत लागू असेल आणि यात या वर्गात मोडणाऱ्या व्यक्तींना थेट भरतीच्या वेळी वयाची कमाल मर्यादा शिथिल करण्याचाही समावेश आहे. दिव्यांगांना बढत्यांमध्ये आरक्षण देण्याचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने हा मुद्दा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.विवक्षित प्रकारचे किमान ४० टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्ती या आरक्षणासाठी पात्र असतील. दिव्यांगांसाठी असलेले हे आरक्षण अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या पदांमध्ये ‘अ‍ॅडजस्ट’ केले जाऊ नये यासाठी हा प्रस्ताव करण्यात आल्याचे कार्मिक मंत्रालयाने म्हटले आहे.एकूण कॅडर संख्येच्या चार टक्के आरक्षण थेट भरतीच्या पदांमध्ये व तेवढेच आरक्षण बढत्यांमध्ये द्यावे, असे या मंत्रालयाने सुचविले आहे. कार्मिक मंत्रालयाने हा प्रस्ताव सर्व मंत्रालयांना व विभागांना पाठविला असून, त्यावर त्यांची मते १५ दिवसांत मागविली आहेत.