शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचा वणवा

By admin | Updated: August 27, 2015 05:29 IST

ओबीसी कोट्यात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हार्दिक पटेल या तरुणाच्या नेतृत्वाखाली गुजरातेतील पटेल समाजाने उभारलेल्या आंदोलनातून उफाळलेल्या हिंसाचाराचे लोण

अहमदाबाद : ओबीसी कोट्यात आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हार्दिक पटेल या तरुणाच्या नेतृत्वाखाली गुजरातेतील पटेल समाजाने उभारलेल्या आंदोलनातून उफाळलेल्या हिंसाचाराचे लोण अहमदाबादसह राजकोट, जामनगर, पाटण, सूरत व मेहसाणामध्येही पोहोचले असून, त्यात आतापर्यंत सात जणांचा बळी गेला आहे, तर अनेक जण जखमी झाले. मंगळवारी रात्रीच्या हिंसक घटनांची बुधवारी सकाळीही अनेक शहरांत पुनरावृत्ती झाल्यानंतर स्थितीवर नियंत्रण मिळविण्यास दंगलविरोधी दल व निमलष्करी दलाचे ५००० हजार जवान तैनात करण्यात आले. शिवाय लष्करालाही पाचारण करण्यात आले. राज्याच्या अनेक मुख्य शहरांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.गुजरातच्या अनेक भागांत हिंसाचार भडकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्याशी सकाळी चर्चा केली. त्यानंतर निमलष्करी दलाचे सुमारे पाच हजार जवान गुजरातकडे रवाना झाले. हिंसाचाराच्या अफवा पसरू नये म्हणून गुजरातमध्ये वॉट्सअप आणि मोबाईल इंटरनेट सेवा खंडित करण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.पोलीसच जबाबदारपटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांनी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होणार, असा इशारा दिला असून हिंसाचारासाठी पोलिसांना जबाबदार ठरवले आहे. बळाचा वापर करून पोलिसांनीच हिंसेला तोंड फोडले.माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध आहे, हे सरकारने सिद्ध करून दाखवावे. माझा वा माझ्या आंदोलनाचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही.- हार्दिक पटेलबंधू-भगिनींनो, मी विनंती करतो की संयम राखा; शांतता बाळगा. हिंसेतून नव्हे, तर चर्चेतून सर्व प्रश्नांचे उत्तर मिळते. सरकार सर्वांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. एकत्र येऊन चर्चेतून समाधान शोधण्याचा प्रयत्न करावा. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान पटेल आरक्षणाच्या मागणीसाठी आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे; मात्र हिंसक आंदोलनाला आमचा विरोध आहे. - लालूप्रसाद यादव, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख