शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण युतीला अनुकूल, आघाडीला प्रतिकूल

By admin | Updated: October 6, 2016 00:19 IST

कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पत्ते साफ

कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पत्ते साफगणेश धुरीनाशिक : जिल्हा परिषदेची बुधवारी काढण्यात आलेली ७३ गटांची सोडत शिवसेना व भाजपा युतीला काहीशी अनुकूल पडली आहे. त्यामानाने राष्ट्रवादीतील २७ पैकी १२ सदस्यांचे आणि कॉँग्रेसच्या विद्यमान १४ पैकी १३ सदस्यांचे गट आरक्षित झाल्याने आघाडीला काहीसे प्रतिकूल ठरले आहे. त्या तुलनेत भाजपाचे संख्याबळ चारच असून त्यांना आरक्षणाचा फारसा फरक पडणार नाही. तर शिवसेनेच्या २१ पैकी अवघ्या ७ ठिकाणी विद्यमान सदस्यांना फटका बसला आहे. उर्वरित ठिकाणी शिवसेनेला एकतर कुटुंबातील सदस्य किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण आरक्षण असल्याने उमेदवारांची शोधाशोध करावी लागणार नाही.या आरक्षणामुळे प्रामुख्याने नाशिकचा विचार केला तर विद्यमान अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांचा गट आरक्षित झाल्याने त्यांना गटाची शोधाशोध करावी लागणार आहे. उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांना पुन्हा संधी नसली तरी कुटुंबातील महिलेला दुसर्‍या तालुक्यातून उभे करावे लागेल. गटनेते रवींद्र देवरे तीन वेळा निवडून येऊनही त्यांची आरक्षणाने गोची केली आहे. सभापती उषा बच्छाव यांना वाखारी गट सर्वसाधारण महिला असला तरी त्यांची उभी राहण्याची शक्यता त्यांनीच नाकारली आहे. आरक्षणाने राष्ट्रवादीचे पारडे जड असलेल्या गटांचा विचार केला तर उमराणे डॉ. भारती पवार, कोचरगाव संगीता ढगे, दुगाव विलास माळी, तळेगाव रोही सुरेखा जिरे, वडनेर भैरव ज्योती माळी, नगरसूल साईनाथ मोरे, राजापूर प्रवीण गायकवाड, पळसे अलका साळुंखे, नायगाव अर्जुन बर्डे, चास अर्जुन मेंगाळ या निवडून आलेल्या सदस्यांचे गट एकतर आरक्षित झाल्याने किंवा खुले झाल्याने राष्ट्रवादीची कोंडी होऊ शकते. त्या तुलनेने शिवसेनेचे आमदार आणि मंत्री असलेल्या निफाड, सिन्नर व मालेगाव तालुक्यात शिवसेनेचे पारडे जड ठरू शकते. कारण येथील बहुतांश गट ओबीसी आणि सर्वसाधारण असल्याने शिवसेनेसोबत भाजपालाही चांगली संधी आहे. मालेगावमध्ये प्रशांत हिरे विरुद्ध राज्यमंत्री दादा भुसे, सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे विरुद्ध आमदार राजाभाऊ वाजे तर निफाडमध्ये आमदार अनिल कदम विरुद्ध भाजपा ज्येष्ठ नेते सुरेश पाटील असा सामना रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. मालेगाव व बागलाणमध्ये प्रत्येकी सात, दिंडोरी सहा तर निफाडमध्ये जिल्हा परिषदेचे दहा गट असल्याने ७३ पैकी ३० गटांचा निकाल निर्णायक राहणार आहे.